Join us

चिडवल्यामुळे घाबरला नागालँडचा विद्यार्थी; तिघांविरोधात वाकोल्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 9:58 AM

तक्रारदार सुनील (नावात बदल) हा नागालँडच्या सिग्नल हंगामी गाव येथे परिवारासोबत राहत असून सध्या समाजशास्त्र विषयाच्या पदवीत्तेराच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.

- गौरी टेंबकर - कलगुटकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागालँडमधून कलिनाच्या मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याला चिंकी चायनीज, चाऊ म्याऊ, कशुबी असे चिडवले. त्यामुळे त्याच्या भावना दुखावल्या. त्यामुळे याप्रकरणी त्याने वाकोला पोलिसांत तक्रार दिल्यावर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार सुनील (नावात बदल) हा नागालँडच्या सिग्नल हंगामी गाव येथे परिवारासोबत राहत असून सध्या समाजशास्त्र विषयाच्या पदवीत्तेराच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. विद्यापीठ्यामध्येच कर्मवीर भाऊराव पाटील या मुलांच्या वसतिगृहात तो वास्तव्यास आहे. सुनीलने वाकोला पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने संध्याकाळी विद्यापीठामधील जेवणाची मेस बंद होती. त्यामुळे तो जवळ असलेल्या मॅकडोनाल्ड कॅफेमध्ये जेवायला निघाला. दरम्यान विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यानंतर मनीपाडा परिसरातून जाताना रात्री साडे नऊच्या सुमारास १८ ते २० वयोगटातील ३ तरुण गल्लीत मोटारसायकलवर बसले होते. सुनीलला पाहून त्यांनी चिडविण्यास सुरुवात केली होती.

विद्यापीठाच्या गेटपर्यंत पाठलागछेड काढणाऱ्यांनी सुनीलचा विद्यापीठाच्या गेटपर्यंत पाठलाग केला. सुनील हॉस्टेल गाठल्यावर अन्य मित्रांना घेऊन मनीपाडात गेल्यावर चिडवणारे तिघे तिथून पसार झाले. ज्यांची नावे किशोर जाधव, राज पवार आणि गॅब्रियल लालगरे अशी असून सुनीलने दिलेल्या जबाबानंतर वाकोला पोलिसांनी  गुन्हा दाखल केला, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक प्रदीप मोरे यांनी दिली.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ