उद्घाटनास नगसेवक आग्रही
By admin | Published: July 12, 2015 12:41 AM2015-07-12T00:41:32+5:302015-07-12T00:41:32+5:30
एनआरआय पोलीस स्टेशनच्या नवीन वास्तूचे बांधकाम पूर्ण होऊनही अद्याप उद्घाटन झालेले नाही. जुन्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसह नागरिकांची गैरसोय होत असून उद्घाटन
नवी मुंबई : एनआरआय पोलीस स्टेशनच्या नवीन वास्तूचे बांधकाम पूर्ण होऊनही अद्याप उद्घाटन झालेले नाही. जुन्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसह नागरिकांची गैरसोय होत असून उद्घाटन लवकर करण्याची मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली आहे.
खाडी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी एनआरआय सागरी पोलीस स्टेशन तयार केले आहे. परंतु जागा नसल्यामुळे १९३० साली बांधकाम केलेल्या बेलापूर गावातील जुन्या वास्तूमध्ये पोलीस स्टेशन भरविले जात आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही ते सुरू केले जात नाही. उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची वाट पाहिली जात आहे. जुन्या पोलीस स्टेशनमध्ये गळती सुरू आहे. लॉकअप नसल्यामुळे आरोपी पळून गेल्याची घटना घडली आहे. लोकमतने याविषयी आवाज उठविल्यानंतर नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनीही लवकरात लवकर उद्घाटन करण्यात यावे, अशी भूमिका घेतली आहे. महापालिका मुख्यालयासमोरील इमारतीमध्ये पोलीस स्टेशन हलविले तर अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरेशी जागा उपलब्ध होईल. लॉकअपसह सर्व सुविधा उपलब्ध होईल. उलवे, सीवूड व बेलापूर सर्व ठिकाणच्या नागरिकांना सदर ठिकाण मध्यवर्ती ठरणार आहे.
उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची वाट पाहू नये. स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा आयुक्तांनी स्वत:च उद्घाटन करून पोलीस स्टेशन सुरू करावे, अशी
मागणी होत असून याविषयी आयुक्तांकडे मागणी
केली जाणार आहे.
जुन्या इमारतीमध्ये पोलीस स्टेशनचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी जागा अपुरी पडत आहे. नवीन पोलीस स्टेशनची इमारत बांधून पूर्ण झाली असून लवकरात लवकर सदर वास्तूमधून पोलीस स्टेशनचा कारभार सुरू केला जाईल.
- विनोद म्हात्रे, नगरसेवक, प्रभाग ११०
बेलापूर गावातील पोलीस चौकीमध्ये लॉकअपची सुविधा नाही. पोलीस स्टेशनमध्ये जागा अपुरी आहे. गळक्या इमारतीमध्ये काम सुरू आहे. नवीन इमारतीचे लवकर उद्घाटन करावे व जुन्या इमारतीमध्ये बिट चौकी ठेवावी.
- अमित पाटील, माजी नगरसेवक, बेलापूर
पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे लवकर उद्घाटन करावे याविषयी आम्ही यापूर्वीच पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे. आयुक्तांना पत्र पाठवून नागरिकांची व पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर करण्याची विनंती करण्यात आली आहे.
- अशोक गावडे, नगरसेवक, प्रभाग १०९
नागरिकांच्या सुविधेसाठी लवकरात लवकर नवीन पोलीस स्टेशन सुरू करावे, अशी मागणी आम्ही पोलीस आयुक्तांकडे करणार आहोत. शक्य तितक्या लवकर हा प्रश्न सुटावा, अशी आमची अपेक्षा आहे.
- भारती कोळी, नगरसेविका, प्रभाग १०५