जिलेटीन काड्यांचे नागपूर कनेक्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:07 AM2021-02-27T04:07:41+5:302021-02-27T04:07:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्कॉर्पिओमधून जप्त केलेल्या जिलेटीन काड्यांवर नागपूर येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीचे नाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्कॉर्पिओमधून जप्त केलेल्या जिलेटीन काड्यांवर नागपूर येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीचे नाव आहे. त्यामुळे जिलेटीन त्या भागातून आणल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कंपनीतून दोनशे जिलेटीनचा बॉक्स देण्यात येतो. बॉक्सवर असलेल्या क्युआर कोडवरून तो माल कुणाला दिला, याची माहिती मिळते. मात्र, या अवघ्या २० जिलेटीन काड्या असल्यामुळे त्याची माहिती मिळणे अवघड आहे. आतापर्यंत ज्यांना जिलेटीनच्या काड्या पुरविण्यात आल्या त्यांच्याकडून या जिलेटीनच्या काड्या गेल्या असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या जिलेटीनच्या काड्यांचे वजन अडीच किलो होते. याचा स्कॉर्पिओमधून स्फोट घडवून आणला असता तर जवळपास ८ ते १० किलोमीटर अंतरावर याचे पडसाद उमटले असते, अशी शक्यताही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे. यातून अंँटालियाच्या प्रवेशद्वारालाही याचा फटका बसला असता, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
..................