नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग जोडणार १९ देवस्थानांना; ८०२ कि.मी. लांबीच्या मार्गाच्या आखणीला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 12:50 PM2024-02-23T12:50:29+5:302024-02-23T12:50:45+5:30
वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधदुर्ग, • ८०२ कि.मी. लांबीच्या या महामार्गावर २६ ठिकाणी इंटरचेंजेस असतील.
मुंबई : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या अंतिम आखणीला राज्य सरकारने मान्यता दिली असून ८०२ कि.मी. लांबीच्या या द्रुतगती महामार्गाद्वारे १२ जिल्ह्यांती जिल्ह्यांतील १९ देवस्थाने जोडली जाणार आहेत. येत्या काही दिवसांत या द्रुतगती महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम केला जाणार असून वर्षअखेरपर्यंत प्रकल्प उभारणीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) मानस आहे.
मुंबई-नागपूर महामार्गाच्या समृद्धी धर्तीवर एमएसआरडीसी शक्तिपीठ या प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार महामार्गाची उभारणी करत आहे. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून हा महामार्ग सुरू होणार असून गोव्याच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे समाप्त होईल. शक्तिपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास ११ तासांत पूर्ण होऊ शकणार आहे. सद्यःस्थितीत या प्रवासासाठी २१ तास लागतात.
वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधदुर्ग, • ८०२ कि.मी. लांबीच्या या महामार्गावर २६ ठिकाणी इंटरचेंजेस असतील.
जोडली जाणारी देवस्थाने
• वर्धा जिल्हा : केळझरचा गणपती, कळंब येथील गणपती मंदिर, सेवाग्राम....
• वाशीम : पोहरादेवी
■ नांदेड : माहुरगड शक्तिपीठ, सचखंड गुरुद्वारा
• हिंगोली : ओढ्या नागनाथ
• बीड : परळी वैजनाथ, आंबाजोगाई शक्तिपीठ
• धाराशिव : तुळजापूर
• सोलापूर : पंढरपुरातील विठ्ठल मंदिर, अक्कलकोट
• सांगली : औंदुबरचे दत्त मंदिर
• कोल्हापूर : नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, अंबाबाई मंदिर आणि संत बाळूमामा समाधिस्थळ,
आदमापूर • सिंधुदुर्ग: कुणकेश्वर मंदिर आणि पत्रादेवी.