नागपूर लाेकमत @ ५०; ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 03:27 AM2021-04-05T03:27:05+5:302021-04-05T03:27:15+5:30
विविध मंत्र्यांनी ट्विट करून केले 'लोगो' चे कौतुक
मुंबई : नागपूर लोकमत सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने एक विशेष लोगो तयार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्याचे अनावरण संपन्न झाले.
रविवारी विविध मंत्र्यांनी ‘लोकमत’ चा नवीन लोगो ट्विट करत लोकमत व संपूर्ण लोकमत परिवाराला नागपूर लोकमत ५० व्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या गौरवशाली वाटचालीत दर्डा कुटुंबासह संपादकीय मंडळ व कर्मचारी यांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण लोकमत परिवाराचे अभिनंदन.
- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री
गेली अनेक वर्ष लोकमत परिवाराने सामाजिक राजकीय व सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका घेतली. विविध विषय प्रखरतेने मांडले. बातमीचा सखोल लेखाजोखा मांडणारे हे वृत्तपत्र आहे. नागपूर लोकमत सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, त्यानिमित्ताने माझ्या शुभेच्छा. - छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेला नागपूर लोकमत ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. दर्डा परिवाराच्या सचोटी, आधुनिकता, आणि पत्रकारितेवरील निष्ठेमुळे लोकमत वाचकप्रिय ठरला आहे. लोकमत समूहाला हार्दिक शुभेच्छा. - बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री
नागपूर लोकमत यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून यानिमित्ताने विशेष लोगो करण्यात आला आहे. अविरत वृत्तपत्र सेवेसाठी समूहाचे सर्वेसर्वा दर्डा कुटुंबीय, महत्त्वपूर्ण भूमिका असणारे संचालक आणि संपादकीय मंडळ, पत्रकार, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन, आणि शुभेच्छा..! - एकनाथ शिंदे, नगर विकास मंत्री
नागपूर लोकमत सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने विशेष लोगो तयार करण्यात आला आहे. लोकमतच्या बातम्या जशा इतरांपेक्षा वेगळ्या असतात तसाच हा लोगो देखील आहे. संपूर्ण परिवाराला माझ्या हार्दिक शुभेच्छा. - अनिल परब, परिवहन मंत्री
विश्वासार्ह म्हणून महाराष्ट्रभर परिचित असलेल्या लोकमत परिवारातील नागपूर लोकमत पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत आहे. लोकमतला घराघरात लोकप्रिय बनवणाऱ्या, लोकमत परिवारातील सर्वांचे मनस्वी अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा..!
- धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री