मुंबई - सैराफ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मनसेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरूसह महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या माध्यमातून मनसेचा झेंडा हाती घेतला. कधी काळी शिवसेनेवर तुफान प्रेम करणाऱ्या नागराज यांनी राजाला 'मनसे' साथ दिली आहे. कारण, सैराटच्या अफाट यशानंतर नागराज यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंनी भेट घेतली होती. तर करिअरमधील स्ट्रगलिंगच्या काळातही नागराज हे शिवसेनेचे कार्यकर्ता होते, असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. मात्र, आज त्यांनी आर्ची आणि परश्यासह मनचिसेत प्रवेश केला.
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळेच मनचिसेच्या माध्यमातून राज यांचे नेतृत्व नागराज यांनी स्विकारले. पिस्तुल्या, फँड्री आणि सैराटच्या झिंगाट यशानंतर नागराज मंजुळे हे नाव बॉलिवूडमध्येही प्रसिद्धीस आले आहे. त्यामुळेच सैराटचा रिमेक 'धडक' हा चित्रपट बनवून दिग्दर्शक करण जोहर यांनी नागराज यांच्या प्रतिभेला हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान दिले. आज नागराज मंजुळे, अभिनेत्री रिंकू राजगुरू व अभिनेता आकाश ठोसर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, सरचिटणीस शशांक नागवेकर, उपाध्यक्ष शर्वणी पिल्लई आणि उमा सरदेशमुख यांच्या उपस्थितीत चित्रपट सेनेचे सभासत्व स्वीकारले. नागराज यांच्या या निर्णयामुळे सिनेरसिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.