नाईक, ठाकरे जमीन व्यवहारांची चौकशी व्हावी; किरीट सोमय्या यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 07:06 IST2020-11-12T00:51:42+5:302020-11-12T07:06:31+5:30
शिवसेनेने मात्र त्यांचे आरोप फेटाळले आहेत.

नाईक, ठाकरे जमीन व्यवहारांची चौकशी व्हावी; किरीट सोमय्या यांची मागणी
मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यात संयुक्तपणे जमिनीचे व्यवहार केल्याचा दावा करत हे व्यवहार प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत असल्यामुळे त्याची चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. शिवसेनेने मात्र त्यांचे आरोप फेटाळले आहेत.
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे नाईक कुटुंब तसेच रश्मी ठाकरे, शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा यांनी एकत्रित जमीन खरेदी केली आहे. याची कागदपत्रे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकांना आम्ही पाठवल्याचे ते म्हणाले. कोणीही जमिनी घेऊ शकतो. अर्णब प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी हे नाटक सुरू आहे. हा पारदर्शक व्यवहार आहे. लोकआयुक्तांनी याची चौकशी केलेली आहे, असे शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी सांगितले.
किरीट सोमय्या हे अर्णब गोस्वामी यांच्यासारखा हत्याऱ्याला वाचवायचा प्रयत्न करत आहेत. एका मराठी बाईचे कुंकू ज्याने पुसले, ज्यामुळे महिलेच्या पतीला आत्महत्या करावी लागली.
- अनिल परब, परिवहन मंत्री