Join us  

भाजपा प्रवेशाविषयी नाईकांचे मौन

By admin | Published: December 13, 2014 1:36 AM

नाईक परिवाराच्या भाजपा प्रवेशाविषयी संभ्रम कायम आहे. भाजपा नेते नितीन गडकरी व गणोश नाईक एकाच व्यासपीठावर आले होते.

नवी मुंबई : नाईक परिवाराच्या भाजपा प्रवेशाविषयी संभ्रम कायम आहे. भाजपा नेते नितीन गडकरी व गणोश नाईक एकाच व्यासपीठावर आले होते. परंतु दोन्ही नेत्यांनी पक्षप्रवेशाविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणोश नाईक भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेने नवी मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विष्णुदास भावे नाटय़गृहात झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकत्र्यानी भाजपात जाण्याचा आग्रह धरला होता. परंतु स्वत: नाईक यांनी मात्र त्याविषयी कोणतेही भाष्य केले नाही. यामुळे आठ दिवसांपासून उलट -सुलट चर्चा सुरू आहेत. मालमत्ता प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी नितीन गडकरी व पूर्ण नाईक परिवार शुक्रवारी एकाच व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमात दोन्ही नेते मौन सोडणार का याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु गणोश नाईक यांनी कार्यक्रमात भाषण करण्यास नकार दिला व गडकरी यांनीही कोणतेच भाष्य केले नाही. प्रसारमाध्यमांशी बोलणोही टाळले. यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
शहरात दिवसभर नाईकांच्या प्रवेशाचे काय झाले, कोण काय बोलले का याविषयी राष्ट्रवादीसह इतर पक्षाचे पदाधिकारीही विचारणा करत होते. परंतु कोणाचीच प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. (प्रतिनिधी)
 
च्राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस असूनही शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिका:यांनी एकही होर्डिग लावले नव्हते. नाईक परिवार भाजपामध्ये जाणार यामुळे त्यांच्या समर्थकांनी होर्डिग लावले नाहीत.
 
च्जे राष्ट्रवादीमध्येच राहणार आहेत त्यांनीही होर्डिग लावले नाहीत. कारण शुभेच्छा दिल्या व नाईक भाजपात गेलेच नाहीत तर राग काढण्याची भीती अनेकांना वाटत होती. यामुळे राज्यभर पक्षाच्या अध्यक्षांचा वाढदिवस साजरा केला जात असताना नवी मुंबईत साधे एक होर्डिगही लागले नाही.