नायर रुग्णालयातील दुर्घटना : पंधरा दिवसांत अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 05:56 AM2018-01-30T05:56:58+5:302018-01-30T05:57:12+5:30

नायर रुग्णालयाच्या एमआरआय मशीनमध्ये अडकून ३२ वर्षीय राजेश मारू याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पालिकेने चौकशी समितीची नियुक्ती केली असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली.

 Nair Hospital accident: Submit report in fifteen days | नायर रुग्णालयातील दुर्घटना : पंधरा दिवसांत अहवाल सादर करा

नायर रुग्णालयातील दुर्घटना : पंधरा दिवसांत अहवाल सादर करा

Next

मुंबई : नायर रुग्णालयाच्या एमआरआय मशीनमध्ये अडकून ३२ वर्षीय राजेश मारू याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पालिकेने चौकशी समितीची नियुक्ती केली असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली. या प्रकरणात पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असल्याचेही पालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले.
या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी उपायुक्त (आरोग्य) सुनील धामणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांना महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. मृताच्या नातेवाइकाला पालिकेनेही आर्थिक मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली
आहे. तसेच, महापालिका कर्मचाºयांना योग्य प्रशिक्षण देण्याची मागणी रवी राजा यांनी आयुक्तांकडे केली आहे.
मारू याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉ. सौरभ लांजेकर (२४), वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण (३५) आणि परिचारिका सुनीता सुर्वे (३५) या तिघांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत आग्रीपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. या गुन्ह्यात तिघांनाही जामीन मिळाला आहे. नायर रुग्णालयाच्या एमआरआय विभागाबाहेर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. शिवाय, या विभागाच्या आवारात प्रवेश करण्यास बाहेरील लोकांना मज्जाव करण्यात आला आहे. घटनेचा तपास होईपर्यंत या ठिकाणी प्रवेश मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title:  Nair Hospital accident: Submit report in fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.