नायर रुग्णालयातही आता एनसीडी कॉर्नर, गरीब रुग्णांची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 05:47 AM2022-09-19T05:47:53+5:302022-09-19T05:48:56+5:30

या दोन प्रमुख रुग्णालयांनंतर आता नायर रुग्णालयातही एनसीडी कॉर्नर सुरू करण्यात आला आहे.

Nair hospital also now has NCD corner, convenience for poor patients | नायर रुग्णालयातही आता एनसीडी कॉर्नर, गरीब रुग्णांची सोय

नायर रुग्णालयातही आता एनसीडी कॉर्नर, गरीब रुग्णांची सोय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालयातील असंसर्गजन्य आजारांच्या कक्षाला (एनसीडी कॉर्नर) मिळालेल्या प्रचंड  प्रतिसादानंतर आता अन्य रुग्णालयात या कक्षाचा विस्तार करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. सायननंतर केईएम रुग्णालयातही कॉर्नर सुरू करण्यात आला. या दोन प्रमुख रुग्णालयांनंतर आता नायर रुग्णालयातही एनसीडी कॉर्नर सुरू करण्यात आला आहे.

पालिका रुग्णालयात सुरू झालेल्या या कक्षांत रुग्णांसह त्यांच्यासोबत येणारे नातेवाईक, कुटुंबीयांच्या चाचण्या कऱण्याची सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाबाचे निदान लवकर होते. याखेरीज, वेळीच उपचार सुरू करता येतात. नायर रुग्णालयात कक्षाचे कामकाज जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.  ऋजुता हाडये पाहणार आहेत.

विशेष हृदयविकार विभागाचीही सुरुवात
नायर रुग्णालयात विशेष ‘आयसीसीयू’ कक्ष सुरू करण्यात आला आहे. हृदयविकार विभागाला १० मटेरियल डेफिब्रिलेटर्स, २१ मल्टिपॅरा मॉनिटर्स, १० अत्याधुनिक ईसीजी मशीन्स, २० तात्पुरते पेसमेकर जनरेटर्स, १ एसीटी मशीन, ५० फॉलर बेड्स विथ मेट्रस, १० हायड्रॉलिक ट्रॉली, २० मिट्रल वॉल्व्होप्लास्टी बलून्स देण्यात आले आहेत. 

Web Title: Nair hospital also now has NCD corner, convenience for poor patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.