मुंबईत कोरोना लसीकरणात नायर, केईएमची आघाडी, महिनाभरात वाढला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 01:27 AM2021-02-15T01:27:50+5:302021-02-15T01:28:12+5:30
corona vaccination in Mumbai : शहर आणि उपनगरात येत्या आठवड्यात खासगी रुग्णालयात लसीकरण प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण हे पालिकेच्या जम्बो रुग्णालयांत सुरू करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग येत आहे. पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचेही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या या लसीकरण प्रक्रियेला महिनाभरात प्रतिसाद वाढत असून, नायर आणि केईएम रुग्णालय यात आघाडीवर आहे. पालिकेच्या नायर रुग्णालयात आतापर्यंत १४,८९६ आणि केईएम रुग्णालयात १३,९३८ लाभार्थ्यांनी लस घेतली आहे.
शहर आणि उपनगरात येत्या आठवड्यात खासगी रुग्णालयात लसीकरण प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण हे पालिकेच्या जम्बो रुग्णालयांत सुरू करण्यात आले आहे. यात केईएम, नायर रुग्णालयानंतर राजावाडी रुग्णालयात १३,९१८, वांद्रे-कुर्ला संकुल जम्बो कोविड केंद्रात ११,११९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात १२,९७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
१६ जानेवारीपासून सुरू केलेल्या लसीकरण प्रक्रियेला सर्वांत कमी प्रतिसाद कुर्ला भाभा रुग्णालयात ३२३, जे. जे. रुग्णालयात ८६१, भगवती रुग्णालयात ९७० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. पालिकेने सुरू केलेल्या चार कोविड केंद्रांमध्ये १८,४१७ लाभार्थ्यांना कोविडचे लसीकरण केले आहे.
लसीकरण जम्बो रुग्णालयांत सुरू
लसीकरण हे पालिकेच्या जम्बो रुग्णालयांत सुरू केले आहे. केईएम, नायर रुग्णालयानंतर राजावाडी रुग्णालयात १३,९१८, वांद्रे-कुर्ला संकुल जम्बो कोविड केंद्रात ११,११९, डॉ. आंबेडकर रुग्णालयात १२,९७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. जम्बो कोविड केंद्रात ११,११९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात १२,९७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.