निवृत्त एसीपीच्या घरातही गर्ल्स हॉस्टेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:55 AM2017-07-30T02:55:58+5:302017-07-30T02:56:32+5:30

अवैध गर्ल्स हॉस्टेलचा शोध सुरू असताना जमुना इमारतीच्या केअर टेकरकडून सहायक पोलीस आयुक्ताच्या (एसीपी) घरात सुरू असलेल्या हॉस्टेलची माहिती मिळाली.

naivartata-esaipaicayaa-gharaatahai-garalasa-haosataela | निवृत्त एसीपीच्या घरातही गर्ल्स हॉस्टेल

निवृत्त एसीपीच्या घरातही गर्ल्स हॉस्टेल

Next

- मनीषा म्हात्रे

मुंबई : अवैध गर्ल्स हॉस्टेलचा शोध सुरू असताना जमुना इमारतीच्या केअर टेकरकडून सहायक पोलीस आयुक्ताच्या (एसीपी) घरात सुरू असलेल्या हॉस्टेलची माहिती मिळाली. त्यानुसार काळबादेवी पोस्ट आॅफिससमोरील बोतावाला इमारत गाठली. तेथील पानटपरीवाल्याकडून चौथ्या मजल्यावर गर्ल्स हॉस्टेल सुरू असल्याचे समजले. जुनी इमारत, त्यात एका माळ्यावर फक्त एकच रहिवासी अशी रचना. चौथा मजला गाठला. बाहेरच एसीपी यू. ए. मनेर यांच्या नावाचा भला मोठा बोर्ड. बोर्डच्या तळाशी ‘निवृत्त’ही लिहिलेले दिसले. त्यामुळे खरंच येथे गर्ल्स हॉस्टेल असेल का, असा प्रश्न निर्माण झाला. म्हणून पुन्हा खाली उतरले. पानटपरीवाल्याकडे खातरजमा करून तिथेच हॉस्टेल सुरू असल्याची माहिती मिळाली.
अखेर निवृत्त एसीपीच्या घराची बेल वाजवली. गर्ल्स हॉस्टेलबाबत विचारणा केली. तेथे असलेल्या तरुणाने आतील दरवाजा उघडला. तेव्हा समोरचे चित्र विचारात पाडणारे. समोरासमोर अशा एकूण १० ते १२ खोल्या. बाहेरच पाण्याच्या बादल्या. अगदी एखाद्या हॉस्टेल अथवा लॉजिंगसारखी व्यवस्था या ठिकाणी पाहावयास मिळाली. जास्त करून विद्यार्थी या ठिकाणी राहावयास आहेत. मुलींसाठी जागा सोईस्कर असली तरी त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मात्र कायम आहे.

(बोतावाला इमारतीखालील पानटपरीवाल्यासोबत साधलेला संवाद)
प्रतिनिधी : येथे गर्ल्स हॉस्टेल आहे का?
पानटपरी मालक : दुसरे और चौथे मंजिलपर पुछताज किजिये. वहां पे है.
प्रतिनिधी : ठीक. धन्यवाद!

चौथ्या मजल्यावर निवृत्त एसीपीच्या घरातील आसीफ नावाच्या तरुणासोबत साधलेला संवाद....
प्रतिनिधी : यहां पे गर्ल्स हॉस्टेल कहां पे है?
आसीफ : हां यहां पे ही है, आपको कहां से पता चला?
प्रतिनिधी : जमुना इमारत के गर्ल्स हॉस्टेल गयी थी. वहांपर रूम फुल्ल हे. वहीं से यहां के हॉस्टेल के बारे मे पता चला.
आसीफ : ओके. यहां पे भी सभी फुल्ल हे. आपको अभी जुन के बादही रूम मिल सकते है.
प्रतिनिधी : यहां सिर्फ लडकियांही रहेती है? फिलहाल कितनी लडकियां है?
आसीफ : हां. सिर्फ लडकियांही रहेती है. एक रूम मे दो लडकियां रहती है. फिलहाल १८ लडकियां है. यहां पे ज्यादा कर के स्टुडण्ट है. आप स्टुडण्ट हो या वर्किंग?
प्रतिनिधी : मै पहले भांडुप में काम करती थी. फिलहाल यहां पे एक वकील के आॅफिस मे नोकरी लगी है. इसलिए यहां नजदिकमे रूम देख रही हूं. यहां पे किराया कितना है?
आसीफ : यहां पे ७ हजार रुपये. सिर्फ रहेना और लाइट बिल लिया जाता है.
प्रतिनिधी : यहां पे किराया कम है. बाकी जगह पे १३ हजार रुपये ले रहे है.
आसीफ : अगर आपको चाहिये हो तो. नीचेही और एक हॉस्टेल है. आप चेक कर सकते हो. मगर वहां पे किराया १३ हजार रुपये रहेगा.
प्रतिनिधी : ठीक है. यहां पे एसीपी का बोर्ड क्यू लगा है? ये पोलीस का है?
आसीफ : हां.. ये जगह एसीपीकी है.
प्रतिनिधी : अच्छा.. ठीक है!

वॉर्ड अधिकारी अनभिज्ञ येथील गर्ल्स हॉस्टेलबाबतही 
सी विभागाचे सहायक आयुक्त जीवक घेगडमल यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा सुरुवातीला याबाबत ते अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. याबाबत सोमवारी माहिती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: naivartata-esaipaicayaa-gharaatahai-garalasa-haosataela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.