नियोजनशून्य कारभाराचा नागरिकांना त्रास का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:34 AM2017-07-29T02:34:54+5:302017-07-29T02:34:56+5:30

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कचरा उचलण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. तरीही पालिकेने वीस हजार चौरस मीटर चटईक्षेत्र असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचरा २ आॅक्टोबरपासून उचलणार नसल्याचे जाहीर केले आहे.

naiyaojanasauunaya-kaarabhaaraacaa-naagaraikaannaa-taraasa-kaa | नियोजनशून्य कारभाराचा नागरिकांना त्रास का?

नियोजनशून्य कारभाराचा नागरिकांना त्रास का?

Next

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कचरा उचलण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. तरीही पालिकेने वीस हजार चौरस मीटर चटईक्षेत्र असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचरा २ आॅक्टोबरपासून उचलणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही नियोजन प्रशासनाने केलेले नाही, तसेच गृहनिर्माण सोसायट्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिलेले नाही. त्यामुळे अचानक कचरा उचलणे बंद केल्यास, नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याने, सर्व पक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी प्रशासनाला धारेवर धरले. या हरकतीच्या मुद्द्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला.
मुलुंड, देवनार डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात येत असल्यामुळे कचरा कुठे टाकणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने २० हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक चटईक्षेत्र असलेल्या सोसायट्यांना नोटीस पाठवून, आपल्या कचºयाची विल्हेवाट आपल्याच परिसरात लावण्यास बजाविले आहे. २ आॅक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
हा निर्णय लागू होण्यास फक्त दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना, पालिका प्रशासनाकडून सोसायट्यांना कोणतेही मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. यावर शिवसेनेच्या राजूल पटेल यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. अनेक सोसायट्यांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध नाही. सोसायट्यांनी कचरा कुठे टाकावा, याबाबत मार्गदर्शन केलेले नाही. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर गोंधळ उडणार असल्याचे पटेल म्हणाल्या.

Web Title: naiyaojanasauunaya-kaarabhaaraacaa-naagaraikaannaa-taraasa-kaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.