नाका कामगार संघटनेचा ३ जानेवारीला राज्यव्यापी मेळावा, जनजागृती अभियानाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:43 PM2020-01-01T22:43:56+5:302020-01-01T22:44:04+5:30
राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमत्य ३ जानेवारीला अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे.
मुंबई : भारतीय सेवा नाका कामगार संघटनेच्यावतीने राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या जनजागृती अभियानाचा ३ जानेवारीला मुंबईत समारोप होणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात होणाऱ्या मेळाव्यासाठी राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती संघटक अॅड. नरेश राठोड व भास्कर राठोड यांनी दिली.
नाका कामगारांच्या प्रलंबित मागण्या, त्यांच्या समस्याची निरागत व्हावी, यासाठी राज्यभरात मेळावे घेवून समाजाला संघटीत केले जात आहे. राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमत्य ३ जानेवारीला अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे. त्यामध्ये उचल्याकार लक्ष्मण गायकवाड, प्राचार्य मधुसिंग जाधव, सुभाष तंवर, मंगल चव्हाण, रामराम महाराज भाटेगावकर, राकेश जाधव, उल्हास राठोड आदी उपस्थित असणार आहेत.