Join us

लष्कराच्या वेशात फसवणुकीचा धंदा, वाहन विक्रीच्या नावे गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 4:33 AM

खोदकाम करताना हाती लागलेले सोने स्वस्तात देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या राजस्थानी टोळीने, लष्कराच्या वेशात फसवणुकीचा नवा धंदा सुरु केल्याचे समोर येत आहे.

मुंबई : खोदकाम करताना हाती लागलेले सोने स्वस्तात देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या राजस्थानी टोळीने, लष्कराच्या वेशात फसवणुकीचा नवा धंदा सुरु केल्याचे समोर येत आहे. ओएलएक्सवरुन आॅनलाईन वाहन विक्रीच्या नावाखाली ही मंडळी नागरिकांना गंडा घालत आहे. मुंबई, ठाणे, पुणेसह राज्यातील विविध भागात अशा स्वरुपाचे फसवणुकीचे प्रकार डोके वर काढीत आहेत.पुण्यातील भोर भागात राहणारे निलेश करे हे सेकण्ड हॅण्ड कारच्या शोधात होते. त्याचदरम्यान ओएलएक्सवरुन एका कारसंबंधी त्यांनी चौकशी सुरु केली. आरोपीने स्वत:ची ओळख अखिलेश कुमार सांगून, तो लष्करातील जवान असल्याचे भासवले. सध्या तो पुणे हवाईतळावर कार्यरत असल्याचेही नमूद केले. त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर लष्कराच्या वेशातील फोटो, ओळखपत्रासह गाडीचे फोटो पाठविले. त्यामुळे करे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. सावज जाळ्यात येताच, कुमारने त्याला गाडी पाहण्यासाठी हवाईतळावर बोलावून घेतले. त्यापूर्वी अ‍ॅडव्हान्स पेमेंट खात्यावर जमा करण्यास सांगितले.त्यांनी सुरुवातीला ३ हजार १५० रुपये जमा केले. दुपारी अडीचच्या सुमारास करे यांनी मित्र रुपेश जाधवसह विमानतळ गाठले. तेथे पोहचल्यानंतर ठगाला कॉल केला असता, विमानतळावरुन गाडी बाहेर काढण्यासाठी संपूर्ण रक्कम भरावी लागणार असल्याचे सांगितले. मात्र करे यांनी गाडी बघितल्याशिवाय पैसे देणार नसल्याचे सांगताच, ठग नॉटरिचेबल झाला. बराच वेळ थांबून देखील कुमारचा काहीच प्रतिसाद आला नाही. अखेर ३ दिवसांनी त्यांनी भोर पोलीस ठाण्यात याबाबत, तक्रार दिली.अशाच प्रकारे मुंबईसह विविध शहरांत या टोळीने फसवणूक केल्याची प्रकरणे समोर येत आहे. त्यानुसार, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. खोदकामातून सोने हाती लागल्याचे सांगून या मंडळींनी मुंबईतील बड्या व्यापारांनास्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचीही माहिती समोर येत आहे.>सतर्क राहण्याची गरजवाढत्या तंत्रज्ञानामुळे या मंडळींनी आॅनलाईन फसवणूकीत उडी घेतली आहे. नागरिकांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी लष्कराचे वेश परिधान केल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. त्यामुळे नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहेत.