Join us  

उड्डाणपुलाच्या नामकरणासाठी सेना उतरणार रस्त्यावर

By admin | Published: March 08, 2016 2:24 AM

गोरेगावच्या नव्या उड्डाणपुलाला गोरेगावच्या रहिवासी असलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीतील अग्रणी मृणालताई गोरे यांचे नाव देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी

मनोहर कुंभेजकर,  मुंबईगोरेगावच्या नव्या उड्डाणपुलाला गोरेगावच्या रहिवासी असलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीतील अग्रणी मृणालताई गोरे यांचे नाव देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी आणि गोरेगावकर आक्रमक झाले आहेत. अभियांत्रिकीचा उत्तम नमुना असलेला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेला हा उड्डाणपूल पालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा आहे. येत्या ३० मार्च रोजी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. ‘लोकमत’ने या उड्डाणपुलाच्या नावावरून रस्सीखेच होत असल्याचे वृत्त दिले होते. या बातमीचे गोरेगावात जोरदार पडसाद उमटले. गोरेगाव, जोगेश्वरी आणि दिंडोशी विधानसभा मतदारसंघात ही बातमी अनेक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली. गोरे यांचेच नाव देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी सांगितले.या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार, विभागप्रमुख व माजी महापौर सुनील प्रभू सुरुवातीपासूनच आक्रमक झाले आहेत. प्रभू हे दिंडोशीचे आमदार असले तरी गोरेगाव पूर्वेकडील हा उड्डाणपूल त्यांच्या प्रभाग क्र. ४८मधून जातो. त्यामुळे त्यांनी मृणालतार्इंचे नाव देण्याची मागणी स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) दीपक भूतकर यांच्याकडे गेल्या सप्टेंबरलामध्येच केली आहे. पालिकेच्या सभागृहात हा प्रश्न चर्चेला येणार आहे. या वेळी शिवसेना मृणालतार्इंच्या नावासाठी आग्रही भूमिका घेणार आहे.गोरेगावचे रहिवासी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचीही गोरेगावातील महिलांनी भेट घेतली. त्यांनादेखील मृणालताई गोरे यांचे नाव देण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले आहे.