मुंबई : हिरे खरेदी-विक्रीच्या व्यवहारात चांगला नफा मिळवून देण्याच्या नावाखाली, मुंबईसह, राजस्थान, अहमदाबाद, अमृतसरमधील हिरे व्यापा-यांना कोट्यवधीचा गंडा घालणा-या ठगाला डी. बी. मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रवीण जैन (३८) असे अटक दलालाचे नाव असून, तो अनेक बड्या हिरे व्यापाºयांच्या संपर्कात होता. त्याच्याकडून आतापर्यंत १० हून अधिक गुन्हे उघडकीस आले आहेत. पुण्याचे रहिवासी असलेले हिरे व्यापारी कमल नायडू (५०) यांच्या तक्रारीवरून गेल्या वर्षी मार्च महिन्यात जैनसह त्याच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हिरे विक्रीच्या व्यवहारादरम्यान नायडू हे जैन याच्या संपर्कात आले. ठरल्याप्रमाणे जैन यांनी मुंबई गाठून नायडूला त्यांच्याकडील ६ लाख किमतीचे हिरे दाखविले. जैन आणि त्याच्या दोन मित्रांनी मुंबईतील सराफांना हिरे विकून जास्तीचा नफा मिळवून देतो, असे सांगितले. त्यानंतर, तिघेही ते हिरे घेऊन निघून गेलेआणि नॉट रिचेबल झाले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, नायडू यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, डी. बी. मार्ग पोलिसांनी जैन याच्या फोटोवरून शोध सुरू केला.शनिवारी जैन हा झवेरी बाजारात अन्य सराफासोबत व्यवहार करण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार, तपास पथकाने जैन याला बेड्या ठोकल्या. पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. डी. बी. मार्ग पोलीस २०११पासून जैनच्या शोधात होते. २०११ ते २०१५ दरम्यान त्याच्याविरुद्ध अशा प्रकारे फसवणुकीचे ७ गुन्हे एकट्या डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल आहेत.मुंबई, पुणे, नाशिक, तसेच राजस्थान, अहमदाबाद, अमृतसरमधील १०हून अधिक गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याने अशा प्रकारे १०० हून अधिक सराफांना फसविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार, त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.लवकरच, एलटी मार्ग पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत. त्याने येथील हिरे व्यापाºयाला १ कोटीचा गंडा घातला होता, तर अमृतसरमध्ये १५ लाख, अहमदाबादमध्ये ३५ लाखांचे हिरे घेऊन जैन पसार झाला होता.>बारगर्ल्सवर उडवायचा पैसेजैन हा विविध सराफांकडून घेतलेले हिरे सुरत, अहमदाबाद आणि दिल्लीतील बाजारांत विकत असे. यातून मिळणारे पैसे हे डान्स बारमध्ये उडवित असे. त्याला मुलींचाही नाद असल्याचे तपासात समोर आले आहे.
नफा मिळवून देण्याच्या नावे हिरे व्यापाऱ्यांना गंडा घालणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 1:26 AM