- मनीषा म्हात्रेमुंबई : बोरीवलीच्या कोरा केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आलेल्या आदिवासी तरुणींच्या वसतिगृहात घुसून, अग्निशमन अधिका-याने स्थानिकांना हाताशी धरून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी तपासणीच्या नावाखाली अधिका-याने वसतिगृह अधीक्षिका व तरुणींसोबत असभ्य वर्तन केले. धक्कादायक बाब म्हणजे, कारवाई-दरम्यान तरुणींच्या खोल्यांमध्ये जाऊन त्यांचे चित्रीकरणही केले. दीड तासांच्या गोंधळानंतर वसतिगृहातील सिलिंडर जप्त करून अग्निशमन दलाचा अधिकारी व इतर निघून गेले. या प्रकरणी अग्निशमन दलाचा अधिकारी अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोरीवली पश्चिमेकडील कार्टर रोड परिसरात शासन अनुदानित आदिवासी सेवामंडळ कन्या छात्रालय आहे. अमिता दिनेश मेश्राम (५५) या वसतिगृहाच्या अधीक्षिका म्हणून कार्यरत आहे. येथील इमारत मोडकळीस आल्याने, पालिकेकडून त्यांना गेल्या वर्षी नोटीस बजावली. त्यांच्या वसतिगृहात २५ मुली राहतात. आदिवासी सेवांडळ संचालित मुंबई कार्यकारी मंडळाने हे वसतिगृह ८ जुलै रोजी तात्पुरत्या स्वरूपात बोरीवलीच्या कोरा केंद्रात हलविले. कार्यकारी मंडळाने विकासक जयेश वालीयासोबत तसा करारही करून घेतला. अशातच २७ मार्च रोजी दुपारी वसतिगृहाच्या दरवाजाची बेल वाजली. मेश्राम यांनी दरवाजा उघडताच, अग्निशमन दलाचा अधिकारी असल्याचे सांगून एकाने प्रवेश केला. त्याला नाव विचारले. मात्र, त्याने नाव न सांगता तपासणीसाठी आल्याचे सांगितले.येथे राहण्याची परवानगी कोणी दिली? एनओसी आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू असतानाच, आणखीन ३ ते ४ जण आत शिरले. अशा वेळी वसतिगृहातील मुली बेसावध होत्या. त्यांनी व्यवस्थितपणे अंगावरील कपडे सावरलेही नव्हते. मेश्राम यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ‘जागा इमारतीतील गाड्यांच्या पार्किंगसाठी असून या ठिकाणी वसतिगृह चालवू शकत नाही,’ असे तो अधिकारी सांगत होता.कारवाईत मुलींचे व्हिडीओअग्निशमन दलाच्या अधिकाºयासोबत असलेल्या चौकडी मुलींच्या वसतिगृहात फिरत होते, त्यांच्या खोल्यांमध्ये जाऊन त्यांचे व्हिडीओ काढत होते आणि मुलींसोबतही असभ्य वर्तन केल्याचे मेश्राम यांचे म्हणणे आहे.सीसीटीव्हीमध्ये घटना कैदवसतिगृहाच्या सीसीटीव्हीमध्ये सर्वांचा चेहरा कैद झाला आहे. मात्र,अद्याप पोलिसांकडून यावर कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीसही कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणाजी सावंत यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.
तपासणीच्या नावाखाली अधिकाऱ्यांची गुंडगिरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:44 AM