Join us

महाराष्ट्र राजभवनचे नामकरण करा, RSS शाखा किंवा भाजपा कार्यालय म्हणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 5:51 PM

या भेटीदरम्यान, मदन शर्मा यांनी राज्य सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. 

ठळक मुद्देया भेटीदरम्यान, मदन शर्मा यांनी राज्य सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. 

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी भाजपा नेते आणि समर्थक रांगेत उभे असल्याचे दिसून येते. कंगना व शिवसेना वादावरुन भाजपा व शिवसेना आमने-सामने आल्याचे दिसून येते. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवन येथे जात आहेत. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या मारहाण प्रकरणी आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली असून भाजपा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा नेत्यांच्या भेटीगाठीवरुन काँग्रेसचे माजी आमदार भाई जगताप यांनी टोला लगावला आहे. 

राज्यपालांची भेट घेतलेल्या या शिष्टमंडळात मुंबई भाजपा अध्यक्ष,आमदार मंगलप्रभात लोढा,आमदार अतुल भातखळकर,मदन शर्मा,डॉ.शीला मदन शर्मा,वीरमाता अनुराधा गोरे,निवृत्त ब्रिगेडीअर अजित श्रीवास्तव,निवृत्त मेजर विनय देगावकर,भारतीय सेनादलाचे निवृत्त जवान मधुसूदन सुर्वे,भारतीय नौदलाचे पूर्व जवान शशिकांत सुर्वे आदी मान्यवरांचा समावेश होता. या भेटीदरम्यान, मदन शर्मा यांनी राज्य सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तर, दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना राणौतनेही राज्यपालांची भेट घेतली आपली कैफियत मांडली होती. तत्पूर्वी एनडीएम सरकारमधील मंत्री रामदास आठवलेंनीही राज्यापालांची भेट घेतली होती. 

भाजपा नेते व कार्यकर्त्यांच्या वाढत्या भेटीगाठीनंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष भाई जगताप यांनी राजभवनचे नामकरण करण्याचं सूचवलं आहे. भाजपा कार्यालय किंवा आरएसएस शाखा असं नाव राजभवनचं करावे, असा खोचक टोला भाई जगताप यांनी लगावला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपाचे नेते असून संघ परिवाराचे सदस्यही आहेत. 

कंगनानेही घेतली राज्यपालांची भेट

कंगनानेनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट घेतली असून माझ्यावर अन्याय झाल्याचं सांगत बीएमसीच्या कारवाईची व्यथा राज्यपाल यांच्यापुढे मांडली होती. कंगनाने बहिण रंगोलीसह राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली, मी माझी बाजू राज्यपाल महोदयांना समजावून सांगितली. तसेच मला या प्रकरणात न्याय मिळावा, अशी विनंती त्यांच्याकडे केली. राज्यातील सर्वसामान्य नागरिक आणि विशेषत: महिलांचा व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, म्हणून मला न्याय मिळावा, असेही कंगना म्हणाली.

रामदास आठवलेंनी घेतली भेट

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, राज्य सरकार, कंगना आणि शिवेसना या वादावर आठवले बोलले. तसेच, बीएमसीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही राज्यपाल यांच्याकडे केंद्रीयमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर, आठवले यांनी शिवसैनिकांकडून मारहाण झालेल्या निवृत्त अधिकाऱ्याच्याही घरी भेट दिली होती.  

टॅग्स :राष्ट्रीय स्वयंसेवक संघअशोक जगतापआमदारमुंबईभगत सिंह कोश्यारी