Join us

७८ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी; मुंबई महापालिकेकडून आणखी १० जणांची नावे जाहीर

By जयंत होवाळ | Published: March 19, 2024 8:13 PM

मालमत्ताकर वसुलीच्या अंतिम टप्प्यात महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने आर्थिक क्षमता असूनही जे मालमत्ताधारक कर भरत नाहीत अशांवर लक्ष केंद्रित केले आहे.

मुंबई : सर्वाधिक मालमता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांची नावे मुंबई महापालिकेने जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. १९ मार्च रोजी पालिकेने आणखी १० मोठ्या थकबाकीदारांची यादी नावानिशी जाहीर केली. त्यांच्याकडे ७८ कोटी ६५ लाख ५० हजार ६३१ रुपयांची थकबाकी आहे.

मालमत्ताकर वसुलीच्या अंतिम टप्प्यात महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने आर्थिक क्षमता असूनही जे मालमत्ताधारक कर भरत नाहीत अशांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर आर्थिक अडचणीत असलेल्या मालमत्ता धारकांना टप्प्याटप्प्याने कर भरण्याची मुभा दिली जात आहे. सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने विविध उपाययोजना आखल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी नियोजन करण्यात आले आहे.

मालमत्ता कराचे आर्थिक वर्ष २०२३ - २०२४ ची कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस पाठवण्यात आल्यनंतर विभागीय स्तरावर कार्यालयीन दिवशी तसेच सुट्टीच्या दिवशी करदात्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करवसुलीचे कामकाज सुरु आहे. समाज माध्यमांद्वारे संपर्क करुन तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदनिकानिहाय करवसुलीचे कामकाज सुरु आहे. विविध माध्यमातून जनजागृती करून ३१ मार्च २०२४ पर्यंत करभरणा करण्यासाठी प्रोत्साहिन दिले जात आहे.१९ मार्च रोजी जाहीर झालेली मालमत्ता करधारकांची नावे

१) गजरिया इलेक्ट्रिक - ३८ कोटी ८७ लाख ५३ हजार ५५७ रुपये२) अर्नेस्ट जॉन - ३० कोटी ७२ लाख ११ हजार ८२८ रुपये

३) लैक अहमद रफिक शेख - २ कोटी ३२ लाख ७५ हजार ४५५ रुपये४) सहाजू सहकारी गृहनिर्माण संस्था - २ कोटी २८ लाख ४६ हजार ६४९ रुपये

५) शिवतापी सहकारी गृहनिर्माण संस्था- १ कोटी ६५ लाख १ हजार ४९५ रुपये६) उज्ज्वल सहकारी गृहनिर्माण संस्था- १ कोटी २१ लाख २५ हजार ८०१ रुपये

७) श्री. व्हि. डी. शहा- ९५ लाख रूपये८) ओबेरॉय सहकारी गृहनिर्माण संस्था - ७६ लाख ७५ हजार ९३० रुपये

९) मेसर्स नथानी स्टील प्रायव्हेट लिमिटेड- ७० लाख ९४ हजार ५०१ रुपये१०) हिंदुस्थान डॉर ऑलिव्हर लिमिटेड- ६४ लाख १५ हजार ४१५ रुपये

एकूण - ७८ कोटी ६५ लाख ५० हजार ६३१

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका