मुंबई : एलफिन्स्टन स्टेशनचे नामकरण प्रभादेवी झाल्यानंतर आता आणखी आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी होत आहे. या मागणीला अनुसरून करीरोड, सँडहर्स्ट रोड, मरीन लाइन्स, चर्नी रोड, काॅटन ग्रीन, डॉकयार्ड, किंग्ज सर्कल, मुंबई सेंट्रल या स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात आला. याला मुख्यमंत्र्यांकडून तत्त्वत: मान्यता देण्यात आली असून, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय होऊन केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून नवी नावे द्यावी, अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या रेल्वे स्थानकांच्या परिसरातील इतिहास पाहता, या स्थानकांच्या नामांतराची मुंबईकरांची मागणी आहे.
या स्थानकांचा प्रस्ताव -
करी रोड लालबागसँडहर्स्ट रोड डोंगरीमरीन लाइन्स मुंबादेवीचर्नी रोड गिरगावकॉटन ग्रीन काळाचौकीडॉकयार्ड माझगावकिंग्ज सर्कल तीर्थंकर पार्श्वनाथमुंबई सेंट्रल नाना जगन्नाथ शंकरशेट