पंढरपूरला जाणाऱ्या अपघातग्रस्त बसमधील मृत आणि जखमी वारकऱ्यांची नावं आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 12:21 PM2024-07-16T12:21:15+5:302024-07-16T12:23:00+5:30

आज पहाटे पंढरपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलरचा अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला.

names of the dead and injured passengers in the accident bus going to Pandharpur have come forward | पंढरपूरला जाणाऱ्या अपघातग्रस्त बसमधील मृत आणि जखमी वारकऱ्यांची नावं आली समोर

पंढरपूरला जाणाऱ्या अपघातग्रस्त बसमधील मृत आणि जखमी वारकऱ्यांची नावं आली समोर

आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, मुंबई-पुण्यातूनही मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरला जात आहे. दरम्यान, आज मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅव्हलरचा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. हा अपघात पुणे लेनवर पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला  आहे. ही बस कल्याणहून पंढरपूरच्या दिशेने बस निघाली होती. या बसमधून ५४ वारकरी प्रवास करत होते. ८ जण गंभीर जखमी आहेत. या अपघातातील जखमींची आणि मृतांची नावं समोर आली आहेत.

पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू; ट्रॅक्टरवर आदळून ट्रॅव्हल बस खड्ड्यात कोसळली

५४ वारकरी पंढरपूरकडे जात होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेनं जात असताना भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या ट्रॅव्बल्ससमोर एक ट्रॅक्टर जात होता. ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली. 

मृतांची नावं

१.गुरुनाथ बाबु पाटील (७०) रा. नारविली, ता. पनवेल, जि. रायगड

२. रामदास नारायण मुकादम (७०) रा. नेवाळी, दहिसर ता. कल्याण, जि. ठाणे

गंभीर जखमी

१.बाबुराव धर्मा भोईर (७०) राहणार- घेवर ता- कल्याण,जिल्हा-ठाणे

२. बामा पोग्या भोईर (७०) रा. नारवीली दहिसर, ता.कल्याण, जि. ठाणे

३. गणपत जोंग्या मुकादम (७०) रा. नारवीली दहिसर, ता.कल्याण, जि. ठाणे

४)संजय बापुराव पाटील (६३)
५) सुमन साळुंखे (६०)

जखमी

१.अरुन बाबुराव भोईर (४०)
२. अनंता पाटील (६९)
३.नामदेव पाटील (७१)
४.नितीन भगत (६०)
५.कल्पना पाटील (६०)
६.अरुन भोईर (४५)
७.सपना मुकादम (३४)
८.दशरथ पाटील (५५)
९.उषा देसले (५२)
१०. बाईमा बच्छु माळरगुणकर (६०)
११. लक्ष्मी पाटील (६०)
१२. यमुनाबाई साळुंखे (५४)
१३. सारिका भोईर (६०)
१४. लक्ष्मी पाटील (५०)
१५.निलाबाई साळुंखे (६०)
१६. करसन गायकर (४०)

किरकोळ जखमी

१. बिबीबाई भोईर 
२. गुरुनाथ भोईर
३.गिताबाई भोईर
४.बच्छु भांगुरकर
५.काशिनाथ पाटील 
६.निलम हमारी
७.हर्ष हजारी
८.लक्ष्मी पाटील
९.मच्छिंद्र भिसे
१०.शांता पाटील
११. भिमाबाई पाटील
१२.बन्सीधर ठाकुर
१३.पौर्णिमा काळण
१४.जिजाबाई मुकादम
१५.नर्मदा संखे
१६.विश्वास पाटील 
१७.तुळशीदास मुकादम 
१८.मृणालीनी पाटील
१९.रसिका पाटील
२०.लक्ष्मी संखे
२१.चांगुना भोईर
२२.मारवती भोईर 
२३.गणुबाई भोईर

Web Title: names of the dead and injured passengers in the accident bus going to Pandharpur have come forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.