आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, मुंबई-पुण्यातूनही मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरला जात आहे. दरम्यान, आज मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅव्हलरचा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. हा अपघात पुणे लेनवर पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस कल्याणहून पंढरपूरच्या दिशेने बस निघाली होती. या बसमधून ५४ वारकरी प्रवास करत होते. ८ जण गंभीर जखमी आहेत. या अपघातातील जखमींची आणि मृतांची नावं समोर आली आहेत.
५४ वारकरी पंढरपूरकडे जात होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेनं जात असताना भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या ट्रॅव्बल्ससमोर एक ट्रॅक्टर जात होता. ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली.
मृतांची नावं
१.गुरुनाथ बाबु पाटील (७०) रा. नारविली, ता. पनवेल, जि. रायगड
२. रामदास नारायण मुकादम (७०) रा. नेवाळी, दहिसर ता. कल्याण, जि. ठाणे
गंभीर जखमी
१.बाबुराव धर्मा भोईर (७०) राहणार- घेवर ता- कल्याण,जिल्हा-ठाणे
२. बामा पोग्या भोईर (७०) रा. नारवीली दहिसर, ता.कल्याण, जि. ठाणे
३. गणपत जोंग्या मुकादम (७०) रा. नारवीली दहिसर, ता.कल्याण, जि. ठाणे
४)संजय बापुराव पाटील (६३)५) सुमन साळुंखे (६०)
जखमी
१.अरुन बाबुराव भोईर (४०)२. अनंता पाटील (६९)३.नामदेव पाटील (७१)४.नितीन भगत (६०)५.कल्पना पाटील (६०)६.अरुन भोईर (४५)७.सपना मुकादम (३४)८.दशरथ पाटील (५५)९.उषा देसले (५२)१०. बाईमा बच्छु माळरगुणकर (६०)११. लक्ष्मी पाटील (६०)१२. यमुनाबाई साळुंखे (५४)१३. सारिका भोईर (६०)१४. लक्ष्मी पाटील (५०)१५.निलाबाई साळुंखे (६०)१६. करसन गायकर (४०)
किरकोळ जखमी
१. बिबीबाई भोईर २. गुरुनाथ भोईर३.गिताबाई भोईर४.बच्छु भांगुरकर५.काशिनाथ पाटील ६.निलम हमारी७.हर्ष हजारी८.लक्ष्मी पाटील९.मच्छिंद्र भिसे१०.शांता पाटील११. भिमाबाई पाटील१२.बन्सीधर ठाकुर१३.पौर्णिमा काळण१४.जिजाबाई मुकादम१५.नर्मदा संखे१६.विश्वास पाटील १७.तुळशीदास मुकादम १८.मृणालीनी पाटील१९.रसिका पाटील२०.लक्ष्मी संखे२१.चांगुना भोईर२२.मारवती भोईर २३.गणुबाई भोईर