टिपू सुलतान नामकरणाचा वाद पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:40+5:302021-07-18T04:06:40+5:30

मुंबई : उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली आहे. शिवाजीनगर येथील रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या प्रस्तावाला २०१३ ...

The naming controversy over Tipu Sultan erupted | टिपू सुलतान नामकरणाचा वाद पेटला

टिपू सुलतान नामकरणाचा वाद पेटला

Next

मुंबई : उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली आहे. शिवाजीनगर येथील रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या प्रस्तावाला २०१३ मध्ये पाठिंबा देणारे भाजप आता राजकारण करीत असल्याचा आरोप महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. मात्र शिवसेनेची सोनिया सेना झालेली असून, आपण कधीही स्थापत्य उपनगरे समितीत नव्हतो. त्यामुळे येत्या सात दिवसांमध्ये आपली चूक महाराष्ट्रासमोर आणा, अन्यथा आपल्याविरोधात ५० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला जाईल, असा इशारा भाजपचे आमदार अमित साटम यांनी शनिवारी दिला.

समाजवादी पक्षाच्या स्थानिक नगरसेविका रुक्साना सिद्दिकी यांनी देवनार येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव आणला आहे. मात्र यावरून भाजप विरुद्ध शिवसेना असे राजकारण रंगले आहे. यामध्ये महापौर यांनी उडी घेत २०१३ मध्ये शिवाजीनगरमधील रस्त्याला टिपू सुलतान असे नाव देण्याचा ठराव स्थापत्य उपनगरे समिती व महापालिकेत करण्यात आला. त्या वेळी शिवसेनेबरोबर भाजप सत्तेत असताना त्यांनी विरोध केला नव्हता. भाजप सोयीनुसार राजकारण करीत असल्याचा टोलाही महापौरांनी लगावला होता.

२०१३ रोजी महापालिकेत झालेल्या ठरावामध्ये शिवसेना नगरसेवक शैलेश फणसे हे सूचक तर भाजपचे तत्कालीन नगरसेवक अमित साटम यांचे अनुमोदक म्हणून नाव दिले आहे. असे महापौरांनी कागदपत्रे दाखवून भाजपला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. यावर प्रत्युत्तर देत, आपली सुलतानवरील श्रध्दा झाकण्यासाठी हिंदुहृदयसम्राटांच्या नावाचा आधार आपण घेतच आहात. माझेही नाव बनावट कागदपत्राच्या आधारे दाखवून आपले खोटे बोलणे रेटत आहात, असा संताप अमित साटम यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The naming controversy over Tipu Sultan erupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.