नाना आंबोलेंच्या शाखेत मात्र जल्लोषाचे वातावरण

By admin | Published: February 3, 2017 01:15 AM2017-02-03T01:15:43+5:302017-02-03T01:15:43+5:30

परळमधील शिवसेनेचे पॉवरफुल नगरसेवक नाना आंबोले यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी शिवसैनिकांच्या उत्साहावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसले नाही

Nana Ambolle's branch, however, | नाना आंबोलेंच्या शाखेत मात्र जल्लोषाचे वातावरण

नाना आंबोलेंच्या शाखेत मात्र जल्लोषाचे वातावरण

Next

मुंबई : परळमधील शिवसेनेचे पॉवरफुल नगरसेवक नाना आंबोले यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी शिवसैनिकांच्या उत्साहावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसले नाही. सिंधू म्हसूरकर या अतिशय जुन्या कार्यकर्तीला वॉर्ड २०३मधून तिकीट मिळाल्याने शिवसेना शाखेत फटाक्यांची जोरदार आतशबाजीसह जल्लोष करण्यात आला.
सिंधूतार्इंचे पती रवी मसूरकर हे जुने निष्ठावान शिवसैनिक आहेत. शिवसेनेसाठी ते तुरुंगात गेले होते. स्वत: सिंधूताई शिवडी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना महिला संघटक आहेत. एक अपवाद वगळता कायम शिवसेनेच्या पाठीशीच हा वॉर्ड राहिला आहे. ‘शिवसेनेमुळे आपण आहोत याचे भान आंबोले यांना राहिले नाही, आता त्यांना निकालात ते दिसेलच, असे सिंधूताई म्हणाल्या. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आता पत्नीला निवडून आणण्याचे आव्हान आंबोले यांच्यासमोर आहे. आंबोले विरुद्ध शिवसेना अशी रंगतदार लढत या ठिकाणी होणार आहे. या भागातील शिवसेनेचे पूर्वीचे आमदार दगडू सकपाळ यांच्याशी त्यांचे खटके उडायचे. आमदार अजय चौधरी यांच्याशीही त्यांचे मुळीच पटत नाही. ‘मला राजकारणातून संपविण्याची भाषा चौधरी करतात; पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. शिवसेनेत प्रामाणिकपणे काम करूनही आपली कोंडी केली जात होती, असे अंबोले म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

मी एकच तिकीट मागितले होते - आंबोले
मी पत्नी तेजस्विनीसाठी वॉर्ड २०३मधून तर माझ्यासाठी वॉर्ड २०६मधून शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती, हे अत्यंत निराधार आहे. मी केवळ २०३मधून पत्नीच्या नावाचा आग्रह धरला होता, असे आंबोले यांनी सांगितले.

Web Title: Nana Ambolle's branch, however,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.