नाना पाटेकर यांनी ‘क्लीन चिट’ विकत घेतली, तनुश्री दत्ताचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 03:21 AM2019-06-14T03:21:43+5:302019-06-14T03:22:05+5:30
‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर घडलेले प्रकरण नेमके काय होते?
मुंबई : लैंगिक छळ प्रकरणात भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि सिस्टममुळे नाना पाटेकर यांना ‘क्लीन चिट’ मिळाली. खरे तर त्यांनी ती विकत घेतली, असा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर नाना पाटेकरांनी तिची छळवणूक केली, असा तनुश्रीचा आरोप असून या प्रकरणी नानांसह इतर चौघांविरोधात ओशिवरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या प्रकरणी आरोपविरोधात पुरावे हाती लागत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे.
यावर तनुश्रीने संतप्त प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाच्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब अद्याप नोंदविलेले नाहीत. जबाब पूर्णपणे न नोंदविता पोलिसांनी ‘बी समरी’ फाईल करण्याची घाई करण्याचे कारण काय होते, असा सवाल तिने केला आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर जे घडले आणि मी माझ्या कुटुंबीयांसह कशी त्यातून बाहेर पडले ते भारतीय लोकांनी पुन्हा एकदा पाहावे. मात्र मी शांत बसणार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा लोकांविरोधात आवाज उठवत राहीन आणि एक दिवस मी नक्की जिंकेन, असे तनुश्री दत्ताने म्हटले आहे.
नाना पाटेकर यांना पोलीस वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी योग्य तपास केलेला नाही. अद्याप अनेकांचे जबाब नोंदविणे बाकी असून त्यात शायनी शेट्टी, हेअर ड्रेसर अलिझा, वसीम, मीर अशा सात जणांचा समावेश आहे. ज्यांना काहीच माहीत नाही त्यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले. त्यामुळे आम्ही या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेऊन पुन्हा तपास करण्याची विनंती करणार आहोत, असे तनुश्रीचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले.
‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर घडलेले प्रकरण नेमके काय होते?
च्अकरा वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर नानांनी तिची छळवणूक केली. नृत्याच्या स्टेप्स करताना अश्लीलपणे स्पर्श केला, असा तनुश्री दत्ता हिचा आरोप आहे.
च्चित्रपटाचे कंत्राट साईन केले तेव्हा ती आक्षेपार्ह सीन करणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र तरीदेखील नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी तिला पाटेकर यांच्यासोबत अश्लील डान्स स्टेप्स करण्यास सांगितले, असा तिचा आरोप आहे.
च्या प्रकरणी तिने गोरेगाव पोलिसांत धाव घेतली. मात्र, गोरेगाव पोलिसांनी या घटनेचा उल्लेखच तक्रारीमध्ये केला नाही, असे तिचे म्हणणे आहे.
च्२०१८ मध्ये ती ‘मी टू’ या चळवळीमार्फत लोकांच्या समोर आली आणि तिने नाना पाटेकर, गणेश आचार्य आणि आणखी दोघांवर गंभीर आरोप करीत खळबळ उडवून दिली.
च्आॅक्टोबर, २०१८ मध्ये या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी गुन्हाही दाखल केला.