Join us

Nana Patole: पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच, महाविकास आघाडीत नाना पटोलेंनी दंड थोपटले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 4:04 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोठं विधान केलं आहे. 

मुंबई - देशातील पाच राज्यात जनतेने भाजपला मोठं यश दिलं. त्यात, उत्तर प्रदेशसारख्या बड्या राज्यात भाजपकडे स्पष्ट बहुमत दिले असून काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गोव्यातही भाजपला सत्ता स्थापन करता येणार आहे. त्यामुळे, भाजप नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आनंदोत्सव साजरा करत आहेत. गोव्याचे प्रभारी राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची ही ताकद असल्याचंही भाजप नेते म्हणत आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारवर अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यातच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोठं विधान केलं आहे. 

जनतेचा कौल काँग्रेस पक्षाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याचे आम्ही आत्मचिंतन करु आणि जनतेचे प्रश्न घेऊन पुन्हा नव्या उमेदीने सामारे जाऊ, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक निकालानंतर दिली होती. त्यानंतर, रविवारी काँग्रेस कमिटीची वरिष्ठ नेत्यांसमवेतची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडी सराकरमधील काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी थेट 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार, असेही पटोलेंनी म्हटले आहे. पटोलेंच्या या विधानामुळे आता महाविकास आघाडीतील समन्वयची चर्चा रंगणार असून सहकारी पक्षातील प्रवक्ते किंवा प्रमुखांच्या काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

पराभवानंतर काय म्हणाले होते नाना

लोकशाहीमध्ये जनतेचा कौल महत्वाचा असतो. जनतेने जो कौल दिला त्याचा आम्ही स्विकार करतो. आम्ही पाचही राज्यात मोठ्या ताकदीने लढलो. या निवडणुकीत महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जनतेसमोर गेलो होतो परंतु ते बाजूला पडले. निवडणुकीत हार जीत होतच असते, अटबिहारी वाजपेयी, इंदिराजी गांधी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. पण या पभराभवाने खचून न जता जनतेचे मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा ताकदीने २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जावू, असे नाना पटोलेंनी निवडणूक निकालानंतर म्हटले होते.

टॅग्स :काँग्रेसनाना पटोलेमुख्यमंत्री