"नाना पटोले आम्ही दाऊदच्या पाठिशी असंही म्हणतील...", फडणवीसांचं जशास तसं उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 01:02 PM2022-03-03T13:02:47+5:302022-03-03T13:03:20+5:30

काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनं मंत्री नवाब मलिक यांच्या पाठिशी असल्याचं विधान करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Nana Patole will say the support Dawood also replied devendra Fadnavis on nawab malik case | "नाना पटोले आम्ही दाऊदच्या पाठिशी असंही म्हणतील...", फडणवीसांचं जशास तसं उत्तर!

"नाना पटोले आम्ही दाऊदच्या पाठिशी असंही म्हणतील...", फडणवीसांचं जशास तसं उत्तर!

Next

मुंबई-

काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनं मंत्री नवाब मलिक यांच्या पाठिशी असल्याचं विधान करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नाना पटोले उद्या ते दाऊदच्या पाठिशी असंही म्हणतील. त्यांचं काही सांगता येत नाही, अशी खोचक टीका फडणवीस यांनी यावेळी केली आहे. 

राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ED) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केलेली असून, आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी आहोत, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. याबाबत फडणवीसांना विचारण्यात आलं असता त्यांनी पटोलेंच्या विधानाचा समाचार घेतला. 

"नाना पटोले उद्या आम्ही दाऊदच्या पाठिशी असंही म्हणतील. त्याचं काही सांगता येत नाही. पण भाजपा पक्ष दाऊदच्या सहकाऱ्यांशी व्यवहार केलेल्या मंत्र्याला असं पाठिशी घालणार नाही. नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

ठाकरे सरकारवर कुणाचा दबाव?, फडणवीसांचा सवाल
"जी शिवसेना दाऊदचं नाव आलं तरी आक्रमक होत होती आज त्याच शिवसेनेचे मुख्यमंत्री दाऊदसोबत व्यवहार केलेल्या व्यक्तीला पाठिशी घालत आहे. दाऊद सोबतच्या व्यवहारात हात असलेल्या मंत्र्याला पाठिशी घालण्यासाठी ठाकरे सरकारवर नेमका कुणाचा दबाव आहे हे मुख्यमंत्र्यांना सांगावच लागेल", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Web Title: Nana Patole will say the support Dawood also replied devendra Fadnavis on nawab malik case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.