Join us

नानासाहेब धर्माधिकारी उद्यानात दगडावर चित्र रेखाटण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2020 5:45 PM

Drawing on stone : उद्यानाचा चेहरा मोहरा अजून विविध प्रकारच्या चित्रांनी अधिक आकर्षक होतो आहे.

मुंबई : गोरेगाव पूर्व प्रभाग क्रमांक 54,शर्मा इस्टेट येथे गोरेगावकरांचे आकर्षण असलेले महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी हे पालिकेचे सुंदर उद्यान आहे. या उद्यानात दगडावर सुंदर चित्र रेखाटण्याचे काम सध्या सुरू आहे.पर्यावरणाची महती पटवून  देणारे अनेक उपक्रम या उद्यानात साकारले आहेत.

आता गोरेगावकरांचे स्वागत करण्यासाठी या उद्यानाचा चेहरा मोहरा अजून विविध प्रकारच्या चित्रांनी अधिक आकर्षक होतो आहे.सदर उद्यानातहुबेहूब वाटणाऱ्या एका कुत्र्याचे सुंदर चित्र आर्टिस्ट दिलीप ठाकूर यांनी पूर्ण केले असून सोबत जयंत सावंत, निधी पावसकर यांची साथ त्यांना मिळाली आहे.

आता पी दक्षिण विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप कमी झाला आहे.पालिकेने उद्याने ही नागरिकांसाठी खुली केली आहे. कोरोनाला बाय बाय करण्यासाठी आणि दहा दिवसांवर आलेल्या दिवाळीचे स्वागत करण्यासाठी या उद्यानात रेखाटण्यात येणारी प्राण्यांची चित्रे सज्ज झाली आहे अशी माहिती स्थानिक नगरसेविका व महिला विभागसंघटक साधना माने यांनी दिली.

सदर कामी पी दक्षिण वॉर्डचे उद्यान विभागाचे साहाय्यक अभियंता सचिन पारखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :पर्यावरणमुंबईमुंबई महानगरपालिका