‘नानावटी’मधील इमेजिंग व रेडिओलॉजी विभागाला प्रतिष्ठेची एनएबीएच-एमआयएस अधिमान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 10:53 AM2021-08-19T10:53:17+5:302021-08-19T10:54:08+5:30

एनएबीएच - एमआयएस अधिमान्यता प्राप्त झालेले मुंबईतील एकमेव रुग्णालय

nanavati hospital imaging and radiology dept get NABH MIS accreditation | ‘नानावटी’मधील इमेजिंग व रेडिओलॉजी विभागाला प्रतिष्ठेची एनएबीएच-एमआयएस अधिमान्यता

‘नानावटी’मधील इमेजिंग व रेडिओलॉजी विभागाला प्रतिष्ठेची एनएबीएच-एमआयएस अधिमान्यता

googlenewsNext

मुंबई: नानावटी मॅक्स सुपर स्पेशिअॅलिटी हॉस्पिटल हे एनएबीएच-एमआयएस अधिमान्यता प्राप्त करणारे मुंबईतील एकमेव रुग्णालय ठरले आहे. यासाठीच्या मानकांमध्ये दर्जा सुरक्षितता व्यवस्थापन, दर्जेदार सेवा देणे तसेच सर्व निदानात्मक व इंटरव्हेन्शनल इमेजिंग सेवांबाबत मार्गदर्शन पुरवणे आदी घटकांचा समावेश होतो.

राष्ट्रीय रुग्णालय व आरोग्यसेवा पुरवठादार अधिमान्यता मंडळ (एनएबीएच) हे भारतीय दर्जा परिषदेचे घटकमंडळ, आरोग्यसेवा संस्थांसाठी अधिमान्यता कार्यक्रम प्रस्थापित करण्याच्या व राबवण्याच्या उद्देशाने, स्थापन करण्यात आले आहे.

नानावटी मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवा विभागाचे संचालक व इमेजिंग विभागाचे प्रमुख डॉ. दीपक पाटकर म्हणाले की, मुंबईत सर्वप्रथम एनएबीएच-एमआयएस प्रमाणपत्र प्राप्त करणारे रुग्णालय झाल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. कोणत्याही क्वाटर्नरी केअर आरोग्यसेवा संस्थेसाठी रेडिओलॉजी विभाग हा मध्यवर्ती असतो. आधुनिक रेडिओलॉजी आस्थापनाची व्याप्ती केवळ इमेजिंग अभ्यासापुरती मर्यादित नाही, तर ते मिनिमल इन्वेजिव इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये उपचारात्मक भूमिका निभावते. प्रगत तंत्रज्ञान व अनुभवी तज्ज्ञांची टीम यांच्यासह आम्ही आरोग्यसेवेचे मानक सर्वोत्कृष्ट राखण्यासाठी प्रयत्नशील असतो, असे त्यांनी सांगितले.

नानावटी मॅक्स हॉस्पिटलचा अत्याधुनिक इमेजिंग विभाग ६४-स्लाइस कार्डिअॅक क्षमतेच्या पेट-सीटी स्कॅनरने सुसज्ज आहे आणि याद्वारे कार्डिअॅक सीटी स्कॅन पाच सेकंदांहून कमी काळात पूर्ण होतो. सर्व इमेजिंग प्रणाली पिक्चर आर्कायव्हिंग अँड कम्युनिकेशन सिस्टमने (पीएसीएस) जोडलेल्या आहेत. त्यामुळे अचूक नोंदींसाठी आवश्यक असा उत्कृष्ट दृश्यात्मक दर्जा साध्य करणे शक्य होते.

एमआरआय विभागाकडे ३२ चॅनल्सचा रुंद बोअर आहे. त्याचप्रमाणे कार्डिअॅक एमआरआय, एमआर स्पेक्ट्रोस्कोपी, कार्टिलेज मॅपिंग आदी अनेक प्रगत अभ्यासांतून विकसित झालेले तसेच उत्कृष्ट इमेज दर्जा साध्य करून देणारे शॉर्ट टनेल होल बॉडी ३ टेसला मशिन या विभागाकडे आहे. नानावटी मॅक्स हॉस्पिटलचा इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभाग हा प्रगत एण्डोव्हस्क्युलर प्रक्रिया करणाऱ्या भारतातील काही अगदी मोजक्या केंद्रांपैकी एक आहे. पेडिअॅट्रिक सॉफ्टवेअरसह होल बॉडी डेन्सिटोमेट्री करणारा हा देशातील एकमेव विभाग आहे.
 

Web Title: nanavati hospital imaging and radiology dept get NABH MIS accreditation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.