लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ मुद्रितशोधक आणि लेखक, वाचक चळवळीचे कार्यकर्ते नारायण बांदेकर यांचे मुंबईत सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ते वाचक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे त्यांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने, त्यांनी हाताला मिळेल ते काम करून शिक्षण पूर्ण केले.
लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी सतत ग्रंथालीच्या माध्यमातून प्रयत्न केले. पत्रकारांनी बातमीदारी करताना आपल्या अनुभवांच्या आधारे पुस्तके लिहायला हवीत. पत्रकारांचा हात सतत लिहिता असला पाहिजे, असा त्यांचा नेहमी आग्रह असे. कामगारांचे प्रश्नही त्यांनी सातत्याने लावून धरले. ‘टिळक गेले तेव्हा’ आणि ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वचने’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.
.................................