मुंबई-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या बुलढाण्यातील भाषणाचा समाचार घेतला. तसंच आदित्य ठाकरेंवरही शेलक्या शब्दात टीका केला. "उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यातील सभेत अगदीच मूळमूळीत भाषण केलं. सावरकरांबाबत उद्धव ठाकरे का बोलले नाहीत. ज्या राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला त्याच्याशी आदित्य ठाकरे जाऊन गळाभेट घेतात. आदित्य ठाकरे तर पिल्लू आहे. मला तर वाटतं राहुलला मिठी मारल्यावर आदित्य ठाकरे त्यांच्या कानात वेल डन म्हणाले असतील. सावरकरांबाबत जे विधान केलं त्याबाबत आदित्य ठाकरेंनी राहुल यांचं कौतुक केलं असेल", असं नारायण राणे म्हणाले.
"सीमावादावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी परखड भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील एक इंचही जागा कुठे जाणार नाही. उद्योग धंदे राज्याबाहेर गेल्याचं बोललं जात आहे. पण उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात जे उद्योग गेले त्याबाबत कुणीही काही बोलत नाही. ज्या कंपन्या बाहेर गेल्या त्या कंपन्यांशी दीडवर्ष उद्धव ठाकरेच बोलत होते. मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षात फक्त अडीच तासच खूर्चीवर बसले", असंही नारायण राणे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले असतील 'वेल डन'सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतानाही नारायण राणे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "ज्या सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केलं. त्याच राहुल गांधींची आदित्य ठाकरे जाऊन गळाभेट घेतात. मला तर वाटतं आदित्य ठाकरेंनी भारत जोडो यात्रेत राहुल गांधींना मिठी मारली. त्यावेळी आदित्य ठाकरे राहुल यांच्या कानात वेल डन म्हणाले असतील. सावरकरांबाबत जे विधान केलं त्याबाबत राहुल यांचं आदित्य ठाकरेंनी कौतुकच केलं असेल. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली", असं नारायण राणे म्हणाले.