Join us

नारायण राणे मुंबईत दाखल, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊ न देण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 11:49 AM

नारायण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक त्यांना स्मृती स्थळावर येऊ देणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास आम्ही पर्वा करणार नाहीत. राणेंना या पवित्र स्मृतीस्थळावर येऊ देणार नाही, असा इशाराच विनायक राऊत यांनी दिला आहे. 

मुंबई - केंद्रीयमंत्री नारायण राणे हे दादरच्या शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. त्यासाठी, आज मुंबईत त्यांचं आगमन झालं आहे. नारायण राणेंच्या जनआशीर्वीद यात्रेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते सहभागी झाले आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणेंवर टीका केली आहे. 

नारायण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक त्यांना स्मृती स्थळावर येऊ देणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. राणेंनी आगाऊपणा केल्यास त्यांना स्मृतीस्थळापासून हाकलून दिल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही, असा इशाराच विनायक राऊत यांनी दिला आहे. तुमचा शिवसेनाप्रमुखांशी काय संबंध आहे? ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं, एवढं मोठं केलं, त्या बाळासाहेबांना तुम्ही दु:खी केलं. मग, आता स्मृतीस्थळाचा दर्शन घेताना तुम्हाला लाज वाटत नाही का, असेही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास आम्ही पर्वा करणार नाहीत. राणेंना या पवित्र स्मृतीस्थळावर येऊ देणार नाही, असा इशाराच विनायक राऊत यांनी दिला आहे. 

भाजपाकडून मुंबई महापालिकेची मोर्चेबांधणी

गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकांच्या आगामी निवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेत्यांनी राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. नव्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधावा, यासाठी ही यात्रा काढल्याचे सांगितले जात असले, तरी या माध्यमातून भाजपने महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे आपल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात १९ ऑगस्ट रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन करणार असल्याचे समजते. यावरून आता शिवसेना आक्रमक झाली असून, नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे. 

टॅग्स :नारायण राणे शिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीसविनायक राऊत