Join us  

उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांना सर्वाधिक मनस्ताप दिला; नारायण राणेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 4:19 PM

मुंबई २८ पक्षांचे नेते आले, बाळासाहेब कधीही कुणाच्या घरी, कार्यालयात गेले नाही. सगळेजण मातोश्रीत आले.

मुंबई - बाळासाहेबांचे नाव सांगण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. बाळासाहेबांना जितका मनस्ताप इतरांनी दिला नाही त्याहून अधिक मनस्ताप उद्धव ठाकरेंनी घरात बसून दिला. बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. कोणाचे चांगले पाहवत नाही, साहेबांचे विचार हिमालयाच्या उंचीचे तर उद्धव ठाकरेंचे विचार टेकडीही नाही असा आरोप नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला.

नारायण राणे म्हणाले की, काही गोष्टी वाचल्यानंतर वेदना होतात, बाळासाहेबांचा तो काळ आणि आजचा काळ खूप फरक आहे. बाळासाहेबांचा असा मुलगा असू शकतो वाटत नाही. बाळासाहेबांच्या खूप जवळ मी राहिलोय, बाळासाहेबांचा विचार होता. मी कोकणातील एका गिरणी कामगाराचा मुलगा. वडील नोकरी सोडून गावी गेले आणि मला चेंबूरला मामाकडे सोडले. लोकांचे साहेबांवरचे प्रेम, निष्ठा आम्ही पाहिलेय. बाळासाहेबांनी शब्द उच्चारला तर अंगात रक्त संचारत होते. साहेबांबद्दल कुणी बोलले तर त्याला धडा शिकवल्याशिवाय झोप लागत नाही. अनेकदा २-२ दिवस जिन्याखाली बसून आम्ही काढलेत. समोरच्याला फटकवल्याशिवाय घरी जात नव्हतो असं त्यांनी सांगितले.

तसेच एकनाथ शिंदे फार संयम बाळगतायेत. संयम ठेऊ नका. चांगला कारभार सुरू आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दंगल झाली, शिवसैनिकाचा अपघात झाला, कोण कुठे निधन झाले तरी तुम्ही कुठे गेलात का? आम्ही एकही कोपरा सोडला नाही, खिशात पैसे नसताना शिवसैनिकांच्या मदतीला जायचो. आता कुणीच नाही. योग्यवेळी परिवर्तन झाले हा इतिहास आहे. वाईट कृत्य करणाऱ्याला महाराष्ट्रात संपवलं जाते ही किमया छत्रपतींची आहे. बाळासाहेबांचे तुमच्याबाबत काय मत होते हे मला माहिती होते असा टोलाही राणेंनी लगावला.

दरम्यान, मुंबई २८ पक्षांचे नेते आले, बाळासाहेब कधीही कुणाच्या घरी, कार्यालयात गेले नाही. सगळेजण मातोश्रीत आले. परवा हे नेते आले. गँड हयातमध्ये कार्यक्रम होता. हयातच्या गेटवर वाकून स्वागत करत होते. हमालीचे काम उद्धव ठाकरे गटाला होते. खासदार नसलेले पक्ष येतायेत त्यांच्या नेत्यांना नमस्कार करत होते. बाळासाहेबांनी मराठी माणसाला कुणापुढे वाकू नये शिकवले आणि उद्धव ठाकरे बाण नसलेले धनुष्यझाले. विचार पटले नाहीत म्हणून तू इतका वाईट विचार करणार. ज्या शिवसैनिकांनी शिवसेना वाढवली, देशभरात बाळासाहेबांचे नाव झाले, साहेबांनी सगळ्यांची मने जिंकली. गरिब, श्रीमंत भेद केला नाही. मान-सन्मान प्रत्येक माणसाचा केला. एकदा दौऱ्यावर जाताना उद्धव ठाकरे आणि मी खासगी विमानाने चाललो होतो. तेव्हा जीडीपी काय आहे हे मला विचारले. दुसऱ्याची चेष्टा करतो, स्वत:ला काय येते अशी टीकाही राणेंनी केली.

टॅग्स :उद्धव ठाकरेनारायण राणे बाळासाहेब ठाकरे