Join us

Narayan Rane : पोलीस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का?, फडणवीसांनी दाखवला कायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 1:39 PM

Narayan Rane : राणेंच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण, सरकार ज्याप्रमाणे बेकायदेशीरपणे गैरवापर करतेय ते पाहता, भाजपा नारायण राणेंच्या पाठिशी आहे. फडणवीस यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केले आहेत.

ठळक मुद्देराणेंच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण, सरकार ज्याप्रमाणे बेकायदेशीरपणे गैरवापर करतेय ते पाहता, भाजपा नारायण राणेंच्या पाठिशी आहे. फडणवीस यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केले आहेत.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड, पुणे आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिकपोलिसांनी दिले आहेत. त्यावरुन, आता भाजपही आक्रमक झाल्याचे दिसून येते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नारायण राणेंच्या पाठिशी असल्याचं म्हटलंय.   

नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेची उडी कुठपर्यंत जाते ते बघू. केंद्रात आमचीच सत्ता आहे, असा इशारा राणेंनी दिला आहे. त्यानंतर, आता फडणवीसांनी कायद्याची भाषा बोलून पोलिसांना चांगलंच सुनावलं आहे. हा अदखलपात्र गुन्हा असून तो दखलपात्र होण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला आहे. 

राणेंच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण, सरकार ज्याप्रमाणे बेकायदेशीरपणे गैरवापर करतेय ते पाहता, भाजपा नारायण राणेंच्या पाठिशी आहे. फडणवीस यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केले आहेत. शरगील उस्मानी महाराष्ट्रात येऊन भारतमातेला शिव्या देतो, हिंदूंना खूनी म्हणतो. तेव्हा कारवाई होत नाही, तेव्हा शेपट्या टाकतो. याठिकाणी अख्ख पोलीस फोर्स नाशिकहून निघालय, पुण्याहून निघालंय. खरं तर, कायद्याच्या भाषेत हा गुन्हा दखलपात्र नाही, पण त्याला गुन्ह्यात कनव्हर्ट केलंय. मी आयुक्तांचं पत्र वाचलं, ते काय स्वत:ला छत्रपती समजतात का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा... कोणत्या कायद्याने हा अधिकार दिला, असेही फडणवीस म्हणाले. 

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करताना महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल मला आदर असल्याचे फडणवीस म्हणाले. मी त्यांच्यासोबत 5 वर्षे काम केलंय, असंही त्यांनी सांगितलं. पण, सरकारने बस म्हटल्यावर काहीजण लोटांगण घालत आहेत. केवळ सरकारला खुश करण्याकरिता पोलीस दलच कारवाई करायला लागल, तर महाराष्ट्र सरकारचा नीट राहणार नाही. अगोदरच, पोलिसांची प्रतिमा वसुली कांड झालीय. त्यामुळे, सर्वसामान्यांची पोलीस दलावरील नजर बदलली आहे. राज्यातील सरकार पोलीसजीवी सरकार झालंय. प्रत्येकवेळी उच्च न्यायालयातून चपराक पडतेय, अगदी अर्बण असेल, कंगना असेल किंवा काल परवाची प्रकरणं असतील, असे फडणवीस यांनी म्हटलं. पोलिसांना मी एवढाच सल्ला देऊ इच्छितो, कायद्याने काम करा. बेकायदेशीर काम करणारे पोलीस सध्या कुठे आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले.  

भाजपाच्या कार्यालयावर हल्ला केल्यास खबरदार

भाजपाच्या कार्यालयावर हल्ला केल्यास खबरदार, ते सहन केलं जाणार नाही. आमच्या कार्यालयावर हल्ला केलेल्यांविरुद्ध कारवाई न झाल्यास त्या जिल्ह्यातील पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर आम्ही दोन्ही विरोधीपक्षनेते जाऊन बसणार, असे फडणवीस यांनी म्हटले. आम्ही रस्त्यावर येऊन लढणारे लोकं आहोत, असेही ते म्हणाले. दरम्यान, राज्यभरात वातावरण तापलं आहे. शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ठिकठिकाणी राणेंविरोधात घोषणाबाजी आणि आंदोलनं सुरू आहेत. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनारायण राणे पोलिसनाशिक