Join us

Narayan Rane : पुढचा नंबर अनिल परब की अनिल देशमुख?, बाळासाहेबांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 12:24 PM

Narayan Rane : नारायण राणें हे अतिशय खालच्या स्तराची भाषा बोलतायंत. राणे एकटेच नाहीत, तर रावासाहेब दावने यांनीही अशीच भाषा वापरली असून ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देनारायण राणें हे अतिशय खालच्या स्तराची भाषा बोलतायंत. राणे एकटेच नाहीत, तर रावासाहेब दावने यांनीही अशीच भाषा वापरली असून ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. रात्री उशीरा त्यांना महाड कोर्टाकडून जामीनही मिळाला. त्यानंतर, भाजपाने आक्रमक पवित्र घेतला असून राणेंच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. एकीकडे भाजपा आक्रमक झाली असताना मंत्रीमंडळाचे शिवसेनेच्या सहकारी पक्षाचे नेतेही राणेंना लक्ष्य करत आहेत. काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही राणेंवरील कारवाईचं समर्थन केलंय.

नारायण राणें हे अतिशय खालच्या स्तराची भाषा बोलतायंत. राणे एकटेच नाहीत, तर रावासाहेब दावने यांनीही अशीच भाषा वापरली असून ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. राणेंवर महाराष्ट्र सरकारने कारवाई केली. भाजप म्हणतयं आता पुढचा कोणाचा नंबर, अनिल देशमुख की अनिल परब, असा प्रश्न थोरात यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना या कारवाईचा संबंध कोणाशीही लावायचं कारण नाही. कोणी चुकीचं बोललं, वागलं, तर कारवाई होणारच, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

भाजपाचे हे 4 नेते जेव्हा केंद्रात मंत्री झाले तेव्हा आम्हालाही बरं वाटलं. आता, महाराष्ट्रातील चार प्रश्न सुटतील, 4 खात्याशी संबंधित जनतेची कामे मार्गी लागतील, असे आम्हाला वाटलं. पण, जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ते जे वक्तव्य करत आहेत, ते दुर्दैवी आहे. या मंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आशीर्वाद घ्यावेत, असे थोरात यांनी म्हटले आहे. 

विनायक राऊत यांचा राणेंवर हल्लाबोल

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज सकाळी पुन्हा एकदा राणेंवर हल्लाबोल केला आहे. राणेंना जामीन मिळाला असला तरी ते आता राज्यात ज्या ज्या ठिकाणी जातील तिथं भाजपचा पराभव निश्चित आहे, हे भाजपनं ओळखावं, असं विनायक राऊत म्हणाले. केंद्रीय मंत्रिपदी विराजमान असताना असली बेफाम वक्तव्य करुन चालत नाही. तुम्ही काही कायद्यापेक्षा मोठे नाही. त्यामुळे यापुढे ते काळजी घेतील अशी आशा आहे, असेही राऊत म्हणाले.   

टॅग्स :बाळासाहेब थोरातशिवसेनानारायण राणे अनिल परबअनिल देशमुख