Join us

त्याची जीभ जागेवर ठेवायची नाही, नारायण राणेंकडून संजय राऊतांचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 5:16 PM

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या

मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय यांच्या वक्तव्याचा खासदार नारायण राणेंनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. आमच्या दैवताबद्दल कुणीही असं काही बोलत असेल, तर त्याची जीभ जागेवर ठेवायची नाही, असे म्हणत राणेंनी संजय राऊतांना लक्ष्य केले. तसेच, शिवसेना आणि काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाल्याचंही ते म्हणाले. 

'इंदिरा गांधींनीच करीम लाला अन् हाजी मस्तानला तुरुंगात डांबले'

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीबाबत केलेले विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी अखेर मागे घेतले आहे. मी केलेल्या वक्यव्यामुळे कुणी दुखावले असेल तर हे विधान मी मागे घेत आहे, असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत बोलताना नारायण राणेंनी काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाल्याचं म्हटलंय. काँग्रेसला सत्ता पाहिजे आणि सत्तेतून पैसा मिळवायचा आहे. त्यामुळे इंदिरा गांधींबद्दल बोलले किंवा नेहरूंबद्दल बोलले तरी काँग्रेसला काहीच वाटणार नाही, असे म्हणत काँग्रेस सत्तेसाठी काहीही सहन करेल, असे राणेंनी म्हटले. त्याचसोबत, शिवसेनेचा जन्मच शिवाजी महाराजांच्या नावाने झालेला आहे. त्यामुळे शिवसेना हे कसं खपवून घेते, असा प्रश्नही राणेंनी विचारला. तर, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांच्या भावाला मंत्रिपद मिळाल नाही, म्हणून ते असं काहीही बोलत आहेत, असेही राणेंनी म्हटले. 

इंदिरा गांधी आणि करीम लालाच्या भेटीबाबतचे विधान संजय राऊत यांच्याकडून मागे 

दरम्यान, उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत, असे संजय राऊत यांनी लोकमत पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीवेळी म्हटले होते. तसेच, एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा दबदबा होता. त्यावेळी मोठमोठ्या नियुक्त्यासुद्धा या अंडरवर्ल्डच्या सल्ल्याने होत. त्याकाळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटल्या होत्या, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. 

टॅग्स :नारायण राणे संजय राऊतशिवसेनाकाँग्रेसमुंबईछत्रपती शिवाजी महाराजउदयनराजे भोसले