नारायण राणे आज करणार नव्या राजकीय वाटचालीची घोषणा, चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:21 AM2017-10-01T01:21:18+5:302017-10-01T01:22:08+5:30

काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे हे १ आॅक्टोबर रोजी आपल्या नव्या राजकीय वाटचालीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Narayan Rane today announced the announcement of the new political move, the discussion is likely to be in full swing | नारायण राणे आज करणार नव्या राजकीय वाटचालीची घोषणा, चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता

नारायण राणे आज करणार नव्या राजकीय वाटचालीची घोषणा, चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता

Next

मुंबई : काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे हे १ आॅक्टोबर रोजी आपल्या नव्या राजकीय वाटचालीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र तेथेही त्यांची घुसमट झाली. परिणामी, राणे नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेसच्या कारभारावरही टीका करत पक्षाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर राणे नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करणार? यावर चर्चेच्या फेºया झडल्या. रविवारी या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, नारायण राणे भाजपामध्ये न जाता स्वत:चा वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता आहे. राणे यांचा हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देईल. राणे यांना महसूल खाते मिळू शकते. राणेंचा शपथविधी ६ आॅक्टोबरला होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. विस्तारामध्ये राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. तर राणेंचे पुत्र नितेश राणे यांची ‘स्वाभिमान’ ही संघटना कोकणात कार्यरत आहे. त्याचा आधार घेत पक्षाची पाळेमुळे रोवण्याचा नारायण राणे यांचा प्रयत्न असणार आहे.
दसºयापर्यंत आपण आपली पुढची वाटचाल स्पष्ट करू, असे राणे यांनी यापूर्वी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे दाखल होत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीत राणे यांच्या भाजपा प्रवेशावर काही चर्चा झाली नव्हती.
त्यामुळेच ते कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आज ही उत्सुकता संपुष्टात येईल, असे मत राजकीय तज्ज्ञांनी वर्तवले आहे.

Web Title: Narayan Rane today announced the announcement of the new political move, the discussion is likely to be in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.