Join us

नारायण राणे यांची खादी-ग्रामोद्योग कार्यालयाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:07 AM

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुंबई कार्यालयाला भेट ...

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुंबई कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी हरियाणातल्या रोहतकमधील तंत्रज्ञान केंद्राचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत असलेल्या या केंद्राचा २० एकरवर विकास करण्यात आला आहे. या केंद्रात दर वर्षी ८,४०० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली. १३५ कोटी लोकसंख्येच्या आपल्या राष्ट्राला अधिकाधिक तंत्रज्ञान केंद्रांची गरज असून त्यांची जलद गतीने उभारणी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

उद्योजकांचे राष्ट्र म्हणून आकार देण्यासाठी आणि सकल राष्ट्रीय उत्पादनात वृद्धी होण्यासाठी या केंद्रांमध्ये विकसित करण्यात आलेले नवे तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवले. या एमएसएमई केंद्रात विकसित तंत्रज्ञान कोरोनाकाळात ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला वेग देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याआधी त्यांनी महाराष्ट्रातील पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम संस्थाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.