आनंद भंडारे यांना नारायण वर्मा पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 08:42 PM2017-08-17T20:42:40+5:302017-08-17T20:42:49+5:30

मराठी अभ्यास केंद्राचे माहिती अधिकार गटाचे प्रमुख आनंद भंडारे यांना पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नंस ट्रस्टचा 2017चा नारायण वर्मा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Narayan Verma Award for Anand Bhandare | आनंद भंडारे यांना नारायण वर्मा पुरस्कार जाहीर

आनंद भंडारे यांना नारायण वर्मा पुरस्कार जाहीर

Next

मुंबई, दि. 17 - मराठी अभ्यास केंद्राचे माहिती अधिकार गटाचे प्रमुख आनंद भंडारे यांना पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नंस ट्रस्टचा 2017चा नारायण वर्मा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नंस ट्रस्टच्यावतीने दरवर्षी समाजासाठी लक्षणीय काम करणाऱ्या एका व्यक्तिचा पुरस्कार देऊन सत्कार केला जातो. यंदा हा मानाचा पुरस्कार मराठी अभ्यास केंद्राच्या आनंद भंडारे यांना 'माझा प्रभाग माझा नगरसेवक' या अहवाल मालिकेसाठी मिळाला आहे. नगरसेवकांनी त्यांना मिळणाऱ्या निधीतून लोकहिताची कोणती कामे केली आहेत याचा आकडेवारीनिशी आनंद भंडारे यांनी मागोवा घेतला. 
सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या कामात असलेला व्यक्तिगत धोका लक्षात घेऊनही आनंद भंडारे यांनी फक्त आपला अहवाल पूर्ण न करता मुंबई शहरातल्या विविध भागातल्या पंधरा कार्यकर्त्याच्या मदतीने पंधरा नगरसेवकांच्या मूल्यमापनाचे अहवाल तयार केले. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एखाद्या स्वयंसेवी संस्थेने केलेला लक्षणीय असा उपक्रम होता. 
उद्या 18 ऑगस्ट रोजी  संध्या साडेपाचच्या सुमारास के.सी. महाविद्यालयाच्या सभागृहात आनंद भंडारे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 

Web Title: Narayan Verma Award for Anand Bhandare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.