नार्को दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक आहे - समीर वानखेडे
By मनोहर कुंभेजकर | Updated: October 29, 2023 18:07 IST2023-10-29T18:06:56+5:302023-10-29T18:07:07+5:30
'देशाची मुख्य समस्या दहशतवाद आणि ड्रग्ज आहे.'

नार्को दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक आहे - समीर वानखेडे
मुंबई- देशाची मुख्य समस्या दहशतवाद आणि ड्रग्ज आहे. जेव्हा हे दोन्ही एकत्र केले जातात तेव्हा त्याला नार्को दहशतवाद म्हणतात. नार्को दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक आणि हानिकारक आहे असे प्रतिपादन आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी आज गोरेगावात केले. गोरेगावच्या झोडपट्टीत येताच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आपला नायक आणि मुलगा आल्याचे जाणवले.
साई लीला फाऊंडेशनतर्फे गोरेगाव (पूर्व ) येथील अशोक नगर येथे नशामुक्त भारत अंतर्गत अंमली पदार्थमुक्ती या विषयावर आयोजित चर्चासत्रात वानखेडे ते बोलत होते. वानखेडे यांनी आपले अनुभव सांगत विविध प्रश्नांना थेट उत्तरे दिली. समाजाने अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले. तेव्हाच जनजागृतीतूनच नशामुक्त समाजाची संकल्पना यशस्वी होईल, असे त्यांनी नमूद केले.
गोरेगावसह अन्य ठिकाणीही अशा कार्यक्रमांसाठी पुढाकार घेण्याची ग्वाही आरपीआयचे नेते चंद्रशेखर कांबळे यांनी दिली. आयोजक रश्मी उपाध्याय आणि श्रद्धा कदम यांनी सर्वांचे स्वागत केले.