कमला मिल आग प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा : विखे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 03:11 AM2018-01-26T03:11:37+5:302018-01-26T03:11:45+5:30
कमला मिल आग प्रकरणी वन अबव्ह व मोजोस बिस्ट्रोचे मालक, कमला मिलचे भागीदार आणि आयुक्तांनी ठपका ठेवलेल्या सर्व मनपा अधिका-यांची ‘नार्को टेस्ट’ करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी केली.
मुंबई : कमला मिल आग प्रकरणी वन अबव्ह व मोजोस बिस्ट्रोचे मालक, कमला मिलचे भागीदार आणि आयुक्तांनी ठपका ठेवलेल्या सर्व मनपा अधिका-यांची ‘नार्को टेस्ट’ करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी केली.
विखे यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकार व महापालिका कमला मिलच्या आगीचे प्रकरण दडपत असल्याचा आरोप केला. कमला मिलमधील बेकायदेशीर बांधकामांना कोणाचे संरक्षण आणि कोणाचा आशीर्वाद होता, त्याचा शोध लावण्यासाठी या दोन्ही हॉटेल्सच्या मालकांची नार्को टेस्ट केली पाहिजे. कमला मिलचे मालक रमेश गोवानी आणि रवि भंडारी यांनी कोणाला पैसे देऊन सर्व बेकायदेशीर कामे केली, त्याचे सत्य जगासमोर आणण्यासाठी ही टेस्ट आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
मनपा आयुक्तांनी विभागीय चौकशीची शिफारस केलेल्या १० मनपा अधिकाºयांसह अटकेत असलेले अग्निशमन अधिकारी राजेंद्र पाटील यांचीही तपासणी करावी, असे म्हणत विखे यांनी आयुक्त मेहतांवर टीका केली.
कीटकनाशक प्रकरणी एसआयटी अहवालावर हल्लाबोल
कीटकनाशक फवारणीतून शेतकरी-शेतमजुरांच्या मृत्यूच्या घटना घडल्यास संबंधित शेतकºयांवरच ३०४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची शिफारस करणाºया एसआयटी अधिकाºयांच्याच मेंदूची तपासणी करा, असा संताप व्यक्त केला.