Join us  

अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 5:33 PM

Ajit Pawar : शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या मुंबई पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे.

Ajit Pawar ( Marathi News ) :   उपमुख्यमंत्री अजित पवार शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अडचणी वाढणार आहेत. अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आव्हान देणार आहेत. काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लिन चीट दिली होती. दरम्यान, आता पु्न्हा एकदा या प्रकरणी अडचणी वाढू शकतात. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना; शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांनी अण्णा हजारे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करत टीका केली आहे. "अनेक यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी झाल्यानंतर त्याच्यात काही निष्पन्न झालं नाही. मग त्यावरती क्लोझर रिपोर्ट सादर करण्यात आला. न्यायालयीन प्रक्रिया असो की चौकशीची प्रक्रिया असो, त्या दोन्ही गोष्टी आम्ही क्लिअर केल्या होत्या. त्यानंतर तो क्लोझर रिपोर्ट केला होता. बारा महिने कुंभकर्णासारखं झोपणारे अचानकपणे जागृत होऊन अशी मागणी करतात. मला वाटतं या स्वयंघोषित समाजसेवकाचा बोलवता धनी कोणतर आहे, यांची नार्को टेस्ट आधी झाली पाहिजे, अशी मागणीही राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी केली. 

"तुमचा महाराष्ट्र्रातील यंत्रणेवर विश्वास नाही, तुमचा महाराष्ट्रातील न्यायपालिकेवर विश्वास नाही. मग अचानक तुम्ही बारा महिन्यानंतर एखाद्या दिवशी उठता अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करता. तुमची गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेली राष्ट्रवादी विरोधातील मोहिम नेमकी कुणाच्या इशाऱ्यावर चालते? हे सुद्धा पाहावं लागेल यासाठी अण्णा हजारेंची नार्को टेस्ट झाली पाहिजे, असंही सुरज चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत, मग ते मित्र आहेत, शत्रू आहे, नेमकं या प्रेमाची भेट अण्णा हजारेंना कुणी दिली हे पाहावं लागेल, असंही चव्हाण म्हणाले. 

अण्णा हजारेंचे आरोप काय?

अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याविरोधात  शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कोणतेही पुरावे नाहीत, असे सांगून मुंबई पोलिसांनी जानेवारीमध्ये न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. दरम्यान आता त्याच प्रकरणातील क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या मुंबई पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे.याच क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार आहेत.  यामुळे आता अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

टॅग्स :अजित पवारअण्णा हजारेराष्ट्रवादी काँग्रेस