Join us

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी शिक्षेविरुद्ध हायकोर्टात; आता सुनावणीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 10:25 AM

डॉ. हमीद दाभोलकरांची हस्तक्षेप याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने त्यांचे अपील दाखल करून घेतले आहे. 

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी  पुण्यातील सत्र न्यायालयाने  दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या दोघांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या, हे स्पष्ट आहे, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदविले. अंदुरे आणि कळस्कर यांनी दाभोलकर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप होता. तर, अन्य आरोपी वीरेंद्रसिंग तावडे, संजीव पुन्हाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता केली होती.

डॉ. हमीद दाभोलकरांची हस्तक्षेप याचिका

दाभोलकरांचा मुलगा हमीद याने अंदुरे आणि कळस्करच्या अपीलात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. डॉ. दाभोलकर २० ऑगस्ट २०१३ रोजी दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना बाइकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.  ९ मे २०१४ रोजी उच्च न्यायालयाने हे प्रकरण पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग केले. दाभोलकर यांच्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली. त्याचवर्षी कन्नड साहित्यिक एम.एम. कलबुर्गी आणि २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांचीही हत्या करण्यात आली.

 

टॅग्स :नरेंद्र दाभोलकरउच्च न्यायालय