400वरून 44वर आल्यानंतर यांना ईव्हीएम घोटाळा दिसू लागलाय; मोदींचा काँग्रेसला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 12:31 PM2018-06-26T12:31:56+5:302018-06-26T12:44:39+5:30
आणीबाणी आणि महाभियोग चालवण्याची कृती ही एकाच मानसिकतेतून आलेली आहे.
मुंबई- आणीबाणी आणि महाभियोग चालवण्याची कृती ही एकाच मानसिकतेतून आलेली आहे. आणीबाणीच्या काळात काँग्रेसनं संपूर्ण देशाची तुरुंगशाळा केली, गांधी कुटुंबासाठी घटनेचा दुरुपयोग केला गेला असून, स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे पाडल्याचा आरोपही नरेंद्र मोदींनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आणीबाणीविषयी आयोजित करण्यात आलेल्या विचारमंथनात ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार उपस्थित होते. 400वरून 44वर आल्यानंतर यांना ईव्हीएम घोटाळा दिसू लागलाय, कर्नाटक निवडणुकीनंतर तुम्हाला ईव्हीएम घोटाळा आढळला नाही काय, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला आहे.
The country never thought that just for lust for power and servility to one family, India would be made into one big jail. Every person lived in fear. Constitution was misused: PM Modi on Emergency pic.twitter.com/gdpMZjdHzw
— ANI (@ANI) June 26, 2018
काय म्हणाले मोदी
- संविधान फक्त पुस्तक नाही तर देशाचं भविष्य, आम्ही संविधान दिवस साजरा केला, काँग्रेसला संविधानाविषयी श्रद्धा नाही
- जनतेच्या नसानसात लोकशाही असल्याचा काँग्रेसला विसर
- काँग्रेस देशाच्या लोकशाहीचा कधीच विचार करत नाही, कारण पक्षातच लोकशाही नाही, संघ, भाजप आणि मोदींच्या नावाने लोकांना घाबरवलं जातं
- किशोर कुमार यांच्या गाण्यांवरही बंदी घातली, त्यांची काय चूक होती?
- कोणे एके काळी काँग्रेसच्या 400 जागा होत्या, आता 48 राहिल्या
- आणीबाणी आणि महाभियोग ही एकच मानसिकता, काँग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात
- आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशाची तुरुंगशाळा केली
The people who trampled upon the constitution, jailed the country's democracy, are today spreading fear that Modi will interfere in the constitution: PM Narendra Modi pic.twitter.com/5Vrj8DKmkr
— ANI (@ANI) June 26, 2018
The party which has no internal democracy cannot be expected to follow the ideals of a democracy: PM Narendra Modi in Mumbai pic.twitter.com/KMxgb6kbPg
— ANI (@ANI) June 26, 2018
When Kishore Kumar ji refused to sing for them, his songs and films were not allowed to be broadcast or played on the radio: PM Narendra Modi on emergency pic.twitter.com/ckyleEqXxG
— ANI (@ANI) June 26, 2018
I respect veteran journalist Kuldip Nayar ji, he fought for freedom during emergency, he maybe a harsh critic of us but I salute him for this: PM Narendra Modi pic.twitter.com/VHszHbBtD1
— ANI (@ANI) June 26, 2018