PM Narendra Modi in Mumbai Live : तुम्ही १० पावलं चाला मी ११ पावलं चालेन; मोदींचे मोठे आश्वासन

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 09:34 AM2023-01-19T09:34:07+5:302023-01-19T20:47:36+5:30

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात आहे. यामध्ये  शिंदे गट ...

Narendra Modi Mumbai Visit Live Updates : PM to flag off 2 new Mumbai metro lines, launch projects worth Rs 38,000 crore | PM Narendra Modi in Mumbai Live : तुम्ही १० पावलं चाला मी ११ पावलं चालेन; मोदींचे मोठे आश्वासन

PM Narendra Modi in Mumbai Live : तुम्ही १० पावलं चाला मी ११ पावलं चालेन; मोदींचे मोठे आश्वासन

Next

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात आहे. यामध्ये  शिंदे गट व भाजपने आघाडी घेतली आहे. याचीच एक झलक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत 38 हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. तसेच, यावेळी 1 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्जही वितरित होणार आहे. दरम्यान, मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज दुपारी 4 वाजता मोदी यांची सभा पार पडणार आहे.  भाजप आणि शिंदे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जबरदस्त तयारी केली आहे. याशिवाय, मुंबईत अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
 

LIVE

Get Latest Updates

06:36 PM

तुम्ही एक पाऊल पुढे या मी ११ पावले येण्यास तयार- नरेंद्र मोदी

दिल्ली ते महाराष्ट्र, महाराष्ट्र ते मुंबई एक सरकार हवेय. फेरीवाल्यांचा धंदा झाला नाही, उसने पैसे घेतलेले होते, ते व्याज देण्यातच जात होते. घरी मुले उपाशी असायची. आता तसे होणार नाही. मिळालेल्या स्वनिधीवर व्याज द्यावे लागणार नाही. तुम्ही एक पाऊल पुढे या मी ११ पावले येण्यास तयार आहे. - नरेंद्र मोदी

06:32 PM

राजकीय स्वार्थासाठी आम्ही कामांना ब्रेक लावत नाही - मोदी

राजकीय स्वार्थासाठी भाजपा आणि एनडीएची सरकारे विकासाच्या कामांना ब्रेक लावत नाहीत. आधी मुंबईत असं होताना वारंवार पाहिलं आहे.- मोदी

06:30 PM

पैसा योग्य ठिकाणी लागला तरच फायदा - मोदी

मुंबईच्या विकासासाठी बजेटची कोणतीही कमतरता नाहीय. परंतू तो पैसा योग्य ठिकाणी लागला पाहिजे. - मोदी.

06:22 PM

काही काळ विकासाचे काम स्लो झाले होते - मोदी

काही काळ विकासाचे काम स्लो झाले होते. परंतू शिंदे-फडणवीसांची जोडी येताच पुन्हा वेग पकडला - नरेंद्र मोदी

06:20 PM

जगातील मोठमोठ्या अर्थव्यवस्था आज बेहाल - नरेंद्र मोदी

ज्याची कल्पना केली जात होती असे इन्फ्रास्ट्रक्टर आज देशात बनत आहे. जगातील मोठमोठ्या अर्थव्यवस्था आज बेहाल आहेत. परंतू या कठीण काळात भारत मोफत रेशन देऊन गरीबांच्या घरातील चूल विझू देत नाहीय. इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसे खर्च करत आहे. - नरेंद्र मोदी. 

06:18 PM

गरीबांसाठीचे पैसे भ्रष्टाचारात जात होते - मोदी

गरीबांसाठीचे पैसे भ्रष्टाचारात जात होते. करदात्यांचा पैसा असाच जात होता. याचे नुकसान करोडो भारतीयांना झाले आहे. आता यात बदल झाला आहे. बहुतांश पैसा लोकांवर खर्च होत आहे. - नरेंद्र मोदी. 

06:17 PM

यापूर्वी गरीबीवर चर्चा, जगातून मदत मागण्यावर वेळ घालविला. - नरेंद्र मोदी

स्वातंत्र्याचा अमृतकाळात विकसित भारताची जेवढी उत्सुकता भारतीयांना आहे, तेवढीच आशा जगात देखील आहे. शिंदेंनी दावोसमधील अनुभव सांगितला. भारत आपल्या सामर्थ्याचा उत्तमप्रकारे वापर करत आहे. यापूर्वी गरीबीवर चर्चा, जगातून मदत मागण्यावर वेळ घालविला. - नरेंद्र मोदी. 

06:12 PM

मुंबईतील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार...; मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात

मुंबईतील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार...; मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात

06:10 PM

मोदींच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे उद्घाटन

मोदींच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे उद्घाटन

05:54 PM

मोदींच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन

मोदींच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. 

05:51 PM

मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

येत्या काळात मोदी आणि आम्ही मिळून मुंबईत एवढा विकास करू की मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणू - एकनाथ शिंदे

05:43 PM

काळं पाढरं करणाऱ्या लोकांचे दुकान बंद होईल - एकनाथ शिंदेंचा ठाकरे सेनेला टोला

मविआच्या काळात राज्याचा विकास झाला नाही. ही मेट्रो, रस्ते झाले की ४० लाख वाहनांची कोंडी संपेल, लोक मेट्रोतून वेगाने प्रवास करतील. मुंबई काही वर्षांनी खड्डेमुक्त होईल. रस्ते काँक्रीटच्या कामांची सुरुवात होईल. डांबराचे रस्ते संपतील, २५ ते ४० वर्षे यांना काम मिळणार नाही. काळं पाढरं करणाऱ्या लोकांचे दुकान बंद होईल हे त्यांचे दु:ख आहे. - शिंदे.

05:37 PM

मुंबईकरांची सुटका करण्याची संधी मोदींमुळेच मिळणार आहे. - एकनाथ शिंदे.

मुंबईकरांची सुटका करण्याची संधी मोदींमुळेच मिळणार आहे.  अनेकांची इच्छा होती, की हा कार्यक्रम मोदींच्या हातून होऊ नये. नियतीची वेगळीच खेळी असते. आज त्यांच्या हस्तेच भूमीपूजन आणि लोकार्पण होत आहे. - एकनाथ शिंदे. 

05:31 PM

मुंबई महापालिकेचे घाणेरडे पाणी समुद्रात जात होते, आम्ही रोखले - फडणवीस

मुंबईचे गटाराचे पाणी जसेच्या तसे समुद्रात सोडले जात होते. मी मुख्यमंत्री असताना पालिकेला तसे करता येणार नाही असे सांगितलेले. पालिकेने कसे करायचे असे विचारले. यावर मी मोदींकडे गेलो आणि नॉर्म बनविण्यास सांगितले. वर्षभरात ते नॉर्म आले. परंतू गेली तीन वर्षे ते राबविले गेले नाहीत. त्या लोकांचे जुळत नव्हते. काय जुळत नव्हते? तुम्हालाही माहिती आहे. शिंदे सरकार आल्यावर त्यावर काम सुरु झालेय. - फडणवीस. 

05:26 PM

शिंदेंच्या धाडसामुळे पुन्हा डबल इंजिन सरकार - फडणवीस

शिंदेंच्या धाडसामुळे पुन्हा डबल इंजिन सरकार आलेय. १.१५ लाख फेरीवाले, दुकानदारांना स्वनिधीचा पैसे मिळणार आहे. गेल्या सरकारने ठराव घेऊन हा पैसा रोखलेला. हा पैसा मुंबईत मिळणार आहे, काही दिवसांनी राज्यभरात दिला जाईल. - फडणवीस. 

05:24 PM

फडणवीस यांचे भाषण सुरु

पंतप्रधान स्वनिधीची योजना महत्वाची आहे. - फडणवीस 

05:13 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा बीकेसी मैदानात

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा बीकेसी मैदानात पोहोचला. कार्यकर्त्यांना कारच्या सनरुफमधून बाहेर येत अभिवादन. 

04:38 PM

चंद्रशेखर बावनकुळे मुंबई विमानतळावर

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई विमानतळावर दाखल. 

04:21 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात मुंबईत उतरणार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात मुंबईत उतरणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळावर दाखल झाले आहेत.

04:08 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमस्थळी रवाना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमस्थळी रवाना झाले आहेत. तर शिंदे गटाचे ठाण्यातील कार्यकर्ते देखील बसने बीकेसीकडे रवाना झाले आहेत. 

03:51 PM

स्वागताची जय्यत तयारी 

थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार, स्वागताची जय्यत तयारी 

03:37 PM

मेट्रो रेल्वेमधून प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी या मेट्रो रेल्वेमधून प्रवास करणार आहेत.

03:32 PM

सभेच्या ठिकाणी बॅनर्सची कमान कोसळली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसी येथील सभेच्या ठिकाणी बॅनर्सची कमान कोसळली. या घटनेत एक पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण, सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

03:28 PM

नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच स्वागत करण्यासाठी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल उपस्थित राहणार आहेत. तर भाजपा आणि शिंदे गटाचे सगळे मंत्री व्यासपीठावर करणार मोदींच स्वागत आहेत.

03:25 PM

निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पंतप्रधान मुंबईत, भास्करराव जाधव यांचा हल्लाबोल

कोरोनाच्या काळात मुंबई मोठ्या संकटात, पण नरेंद्र मोदी मुंबईत आले नाहीत. कोरोनाकाळात मोदी साहेबांनी विशेष काळजी मुंबईत घेतलेली नाही.पूर्वी शिवसेनेने जी काम आखली होती त्यांचेच उद्घाटन करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत.निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करायची, ही नरेंद्र मोदी यांचे खासियत आहे. 
 

01:55 PM

...हीच शिवसेनेची ताकद : अंबादास दानवे

मुंबई पालिका निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत, हीच शिवसेनेची ताकद आहे, असे शिवसेनेचे ठाकरे गटातील नेते अंबादास दानवे म्हटले आहे.

01:40 PM

सभेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज दुपारी 4 वाजता नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे. सभेच्या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे. सभेला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्क्रीनिंग होत आहे. दरम्यान, सभेच्या ठिकाणी कार्यकर्ते, लाभार्थी यांच्यासाठी वेगवेगळी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
 

12:43 PM

कार्यक्रमाआधीच विरोधक नाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाआधीच विरोधक नाराज झाले आहेत. मुंबईतील विरोधी पक्षातील खासदार, आमदाराचे निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.  शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी निमंत्रण द्यायला आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना विचारला जाब विचारल्याचे समजते. दरम्यान, खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने शिवसेना ठाकरे गटात नाराजी आहे. 

12:36 PM

कल्याण, डोंबिवलीमधून 150 पेक्षा अधिक बसेस

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी कल्याण, डोंबिवलीमधून 150 पेक्षा अधिक बसेस येणार आहेत. स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी या बसमध्ये आपल्या परिसरातील कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत येणार आहेत.

12:03 PM

शिंदे गटांच्या नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाचे दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटांच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले आहे.

11:51 AM

'मी मुंबईत असेन...', दौऱ्याआधी PM मोदींचं मराठीत ट्विट

नरेंद्र मोदींनी आपल्या दौऱ्याआधी काल मराठीत ट्विट करत आपण मुंबईत येत असल्याची माहिती दिली.

11:47 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजचे कार्यक्रम

दुपारी 4.40 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबई विमानतळावर स्वागत करणार

सायं. 5 : मुंबईतील विविध प्रकल्पांचे लोकार्पण/भूमिपूजन/लाभ वितरण व सभा, बीकेसी, मुंबई

सायं. 6.30 : मुंबई मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण, गुंदवली मेट्रो स्टेशन, अंधेरी, मुंबई

सायं. 7.20 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप देण्यासाठी मुंबई विमानतळावर उपस्थित राहणार.

11:35 AM

मुंबईतील ‘या’ बॅनर्सची चर्चा

मुंबईतील गिरगाव आणि मरीन लाइन्स येथे बॅनर्स लावण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील आगमनापूर्वीच हे बॅनर्स लावण्यात आली आहेत. बाळासाहेबांपुढे मोदींची मान झुकते, अशा आशयाचे हे बॅनर्स झळकवण्यात आले आहे. त्यामुळे या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

11:21 AM

'निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा'

नरेंद्र मोदी यांची सभा बीकेसी मैदानात होणार आहे. या सभेसाठी भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे. या स्टेजच्या खाली 'निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा' असा स्लोगन लिहण्यात आला आहे. तसेच, भव्य रांगोळी सुद्धा काढण्यात आली आहे.

11:19 AM

नरेंद्र मोदींचा आजचा मुंबई दौऱ्याचा कार्यक्रम

दुपारी 4.40 : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आगमनप्रसंगी उपस्थिती, मुंबई विमानतळ.

सायं. 5 : मुंबईतील विविध प्रकल्पांचे लोकार्पण/भूमिपूजन/लाभ वितरण व सभा, बीकेसी, मुंबई.

सायं. 6.30 : मुंबई मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण, गुंदवली मेट्रो स्टेशन, अंधेरी, मुंबई.

सायं. 7.20 : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रयाणप्रसंगी उपस्थिती, मुंबई विमानतळ.

10:40 AM

'... हे शिवसेनेचे यश', संजय  राऊतांचा निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावर शिवसेनेचे ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. अनेक प्रकल्पाची योजना पायाभरणी सुरुवात अनेक अडथळे पार करून शिवसेनेची सत्ता असताना महानगरपालिकेने केलेली आहे आणि त्यातील प्रमुख कामांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, हे शिवसेनेचे यश आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याला आमचा विरोध नसून राजकारण केल्यास बघू, असे संजय राऊत यांनी सांगितले. याशिवाय, बेळगावमधील मराठी बांधवांवरती अत्याचार करू नका, अशी सूचना देऊन त्याबाबत महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांनी घोषणा करावी, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

10:14 AM

नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही बिजनेस संस्था आणि आस्थापना बंद राहतील अशा अफवांचे मेसेज व्हायरल होत आहेत. दरम्यान, मुंबईत सर्व आस्थापने सुरळीत सुरू असून अफवावर विश्वास ठेवू नका असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

10:00 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट

09:44 AM

250 हून अधिक एसटी बसेसची बुकिंग

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी 250 हून अधिक एसटी बसेसचे बुकिंग करण्यात आले आहे. दसरा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा गाड्यांची बल्क बुकिंग करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातून या एसटी बसेस येणार आहेत.   

09:42 AM

मुंबईत प्रचंड बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त मुंबईत प्रचंड पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबईत साडेचार हजार पोलिस तैनात असतील. तर
भाजपचे स्वयंसेवकही तैनात राहणार आहेत. तसेच, या सभेला दीड लाख लोक येण्याचा अंदाज वर्तविण्यात येणार आहे.

09:37 AM

रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

- ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात येईल. या उपक्रमामुळे मुंबई खड्डेमुक्त होण्यास मदत होईल.
- या कामांसाठी अंदाजे ६,०७९ कोटी इतका खर्च येईल. पुढील २४ महिन्यांत हे काम पूर्ण होईल. या कामांतर्गत शहर भागात ७२ किमी.
- लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरात ७१ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत, तर पश्चिम उपनगरात २५४ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.
- यांनुसार तीनही क्षेत्रात एकूण ३९७ किमी. लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.

09:36 AM

या प्रकल्पांचे भूमिपूजन

- १७ हजार १८२ कोटींचे ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प- पालिकेच्या तीन रुग्णालयांचे १ हजार १०८ कोटींचे बांधकाम.
- ६,०७९ कोटी रुपयांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे. 
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील १ हजार ८१३ कोटींच्या पुनर्विकासाचे काम.

09:36 AM

या प्रकल्पांचे होणार लोकार्पण

- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्गिका २ अ म्हणजेच दहिसर पूर्व - डी. एन. नगर या ६ हजार ४१० कोटींच्या प्रकल्पासह मेट्रो मार्ग ७ म्हणजे अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व हा ६ हजार २०८ कोटींचा मेट्रो प्रकल्प.

- पालिकेचे २० नवीन आपले दवाखाने.

Web Title: Narendra Modi Mumbai Visit Live Updates : PM to flag off 2 new Mumbai metro lines, launch projects worth Rs 38,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.