Join us

NCP : राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद का नाही? प्रफुल्ल पटेल यांनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 6:49 PM

Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह ८४ अन्य खासदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. संभाव्य खासदारांची नावेही समोर आले आहेत.

Narendra Modi Oath Ceremony ( Marathi News)  :नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह ८४ अन्य खासदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. संभाव्य खासदारांची नावेही समोर आले आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मंत्रीपद घेण्यास नकार दिला आहे. स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्री किंवा मंत्रिपदाची जबाबदारी घेण्याची ऑफर मला आली होती, मात्र ती फेटाळून लावल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते यापूर्वी कॅबिनेट मंत्री राहिले होते. मात्र, आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांनी एवढेच सांगितले आहे की, ते स्वत: पूर्वी कॅबिनेट मंत्री होते.

PM Modi Oath-Taking Ceremony Live: नरेंद्र मोदी PM पदाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज; ६९ खासदार घेणार मंत्रिपदाची शपथ

प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना ते केंद्रातील मनमोहन सिंग सरकारमध्ये शरद पवार यांच्यासोबत विमान वाहतूक मंत्री होते. यावेळी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा एकच खासदार विजयी झाला आहे. प्रफुल्ल पटेल राज्यसभा सदस्य आहेत. 

मंत्रिपदावरुन अजित पवार यांनीही दिली प्रतिक्रिया

"तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएचा भाग आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी एनडीएच्या बैठकांना मला जाता आले नाही. त्यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पाठवलं होतं. एनडीएच्या सदस्य असलेल्या बैठकीत नरेंद्र मोदींकडे जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आज आम्ही शपथविधीसाठी आलो आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केले आहे. आम्हाला रात्री फोन करण्यात आला होता. त्याआधी आम्ही राजनाथ सिंह, अमित शाह यांच्याशी बैठक झाली होती. महाराष्ट्रातील निकालाबाबत त्यावेळी चर्चा झाली. त्यावेळी मी त्यांना विनंती केली होती की संसदेत राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या चार होणार असल्याने आम्हाला एक मंत्रिपद मिळावं. त्यांनी ठीक आहे म्हटलं. त्यानंतर त्यांचा आम्हाला मेसेज आला की एका सदस्याला संधी देण्यात येईल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. केंद्रीय मंत्री असताना राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार स्वीकारणे आम्हाला योग्य वाटलं नाही. म्हणून आम्ही थांबवण्यासाठी तयार आहोत असे सांगितले. पण आम्हाला केंद्रीय मंत्रीपद हवे आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांनी जी ऑफर दिली होती ती आम्ही नाकारली," असा खुलासा अजित पवार यांनी केला.

टॅग्स :प्रफुल्ल पटेलअजित पवारनरेंद्र मोदी