Join us  

नरेंद्र मोदी अजूनही गुजरातचेच मुख्यमंत्री

By admin | Published: October 11, 2014 11:13 PM

देशातील गोर-गरीब जनतेला अच्छे दिन येणार अशी आशा दाखवून पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी अद्यापही गुजरातच्या मुख्यमंत्र्यासारखे वागत आहेत.

डहाणू : देशातील गोर-गरीब जनतेला अच्छे दिन येणार अशी आशा दाखवून पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी अद्यापही गुजरातच्या मुख्यमंत्र्यासारखे वागत आहेत. गुजरात शिवाय त्यांना दुसरे काही दिसत नाही. त्यांनी चीनच्या पंतप्रधानांचे दिल्ली, मुंबई येथे स्वागत क रण्याऐवजी अहमदाबाद येथे बोलावून गुजरातचे प्रेम जाहीर केले आहे. असे संकुचित मनाचे मोदी महाराष्ट्राचे काय भले करणार अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी डहाणू येथे केली.
राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारासाठी  पवार डहाणूत आले होते.  पवार पुढे म्हणाले की, भारतीय सीमेवर 67 चौक्यांवर पाकिस्तान हल्ले करून अनेक निरपराध जवान आणि नागरीकांचे बळी घेतले. मात्र, ज्यांच्यावर देशाच्या संरक्षणाची धुरा आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र स्वतंत्र संरक्षण मंत्री नेमून जवानांचा आत्मविश्वास न वाढविता महाराष्ट्रात ठिकठिकाणी विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभात दंग झाले आहेत. त्यांना देशाची काळजी नसून फक्त गुजरातचीच काळजी असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांच्या सोबत माजी पालकमंत्री गणोश नाईक, आ. आनंदभाई ठाकूर, तालुका अध्यक्ष राजेश पारेख, नगराध्यक्ष मिहिर शाह, उपनगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, शहर अध्यक्ष शमीपीरा, वसई जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर, मुंकूदराव चव्हाण संघटक करण ठाकूर इ. मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)