काँग्रेस 44 चा आकडा पार करणार की 40 वर अडकणार याचीच चर्चा, नरेंद्र मोदींचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 09:22 PM2019-04-26T21:22:40+5:302019-04-26T21:23:40+5:30
देशातील काँग्रेसची स्थिती विदारक झाली आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सदस्यसंख्या 44 वरून वाढून 50 पर्यंत जाईल की, 40 वर अडकणार अशी चर्चा सुरू आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला.
मुंबई - देशातील काँग्रेसची स्थिती विदारक झाली आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सदस्यसंख्या 44 वरून वाढून 50 पर्यंत जाईल की, 40 वर अडकणार अशी चर्चा सुरू आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला. मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीएच्या मैदावर झालेल्या महायुतीच्या सभेत उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी आपल्या सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडतानाच काँग्रेसची कार्यशैली आणि धोरणांवर टीका केली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली, काँग्रेसची देशातील स्थिती विदारक झाली आहे. स्वातंत्रोत्तर काळानंतर पहिल्यांदाच 2014 मध्ये काँग्रेसने सर्वात कमी जागा जिंकल्या. आता तर काँग्रेस आतापर्यंतच्या सर्वात कमी जागांवर लढत आहे. काँग्रेसचे विसर्जन करा, असे गांधीजींनी सांगितले होते. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपा आणि एनडीएचीच सत्ता येणार आहे. तर काँग्रेस 44 जागांचा आकडा पार करून पन्नाशी गाठणार की 40 वर अडकणार हीच चर्चा सुरू आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला.
PM Narendra Modi at NDA rally in Mumbai: Since independence, the least number of seats that Congress won was 44, in 2014 General Elections. In 2019 General Elections, Congress is making a record of fighting on the least number of seats ever. pic.twitter.com/YnqpmWvxjM
— ANI (@ANI) April 26, 2019
सांस्कृतिक नगरी वाराणसी येथे उमेदवारी अर्ज भरून समृद्धीचे शहर असलेल्या मुंबईत तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विशेष आभार. आज उपेदवारी अर्ज भरताना त्यांनी लावलेल्या उपस्थितीमुळे मला नवी उर्जा मिळाली आहे, असे मोदींनी सांगितले.
Maharashtra: #Visuals from NDA rally in Mumbai; Prime Minister Narendra Modi, Maharashtra CM Devendra Fadnavis, Shiv Sena chief Uddhav Thackeray, RPI chief Ramdas Athawale among others present pic.twitter.com/jYptGn1bZ6
— ANI (@ANI) April 26, 2019