मुंबई - देशातील काँग्रेसची स्थिती विदारक झाली आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सदस्यसंख्या 44 वरून वाढून 50 पर्यंत जाईल की, 40 वर अडकणार अशी चर्चा सुरू आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला. मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीएच्या मैदावर झालेल्या महायुतीच्या सभेत उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी आपल्या सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडतानाच काँग्रेसची कार्यशैली आणि धोरणांवर टीका केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली, काँग्रेसची देशातील स्थिती विदारक झाली आहे. स्वातंत्रोत्तर काळानंतर पहिल्यांदाच 2014 मध्ये काँग्रेसने सर्वात कमी जागा जिंकल्या. आता तर काँग्रेस आतापर्यंतच्या सर्वात कमी जागांवर लढत आहे. काँग्रेसचे विसर्जन करा, असे गांधीजींनी सांगितले होते. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपा आणि एनडीएचीच सत्ता येणार आहे. तर काँग्रेस 44 जागांचा आकडा पार करून पन्नाशी गाठणार की 40 वर अडकणार हीच चर्चा सुरू आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला.
काँग्रेस 44 चा आकडा पार करणार की 40 वर अडकणार याचीच चर्चा, नरेंद्र मोदींचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 9:22 PM